नजरेचा खेळ...


एकदा बघितल्यावर तुझ्याकडे
सारखे बघावेसे वाटते,
बघता बघता तुझा राग पाहून
नजर आपोआप खाली जाते,


माझं लक्ष्य नसताना
चोरून मलाच बघतेस,
आणि आशा या खेळiची
सुरवात मात्र तूच करतेस,


खुप काही बोलायचय
खुप कही विचारावस वाटतय,
रागाने बघताना राग, पण मग,
चोरून बघताना काय?
हेच समजावून घ्यायचय,


पण एकदा बघितल्यावर तुझ्याकडे
सारखेच बघावेसे वाटते...

मी अन् माझी स्वप्नं...

इवल्याशा डॉळयांत
आभाळाएवढी स्वप्नं घेउन..
रोज कोवळया ,ताज्या पहाटॅ उठते.,
लाल , तांबडया सूर्याला पाहून..
तेजस्वी बनण्याची एक उर्मी घेऊन..
कोवळया ऊन्हाचा तजेला घेऊन..
वार्‍याचा वेग अन् ढगांच बळ घेऊन..
नवीन दिवसाची सुरुवात करते..
पंख लावून उडते अवकाशात माझ्या..
फुलपाखरांच्या पंखावरल्या रंगांत मिसळून जाते..
पाण्यातल्या प्रतिबिंबात..
तरंगत राहते,
लव्हाळींचा गुंता सोडवत..
फुलांच्या पा़कळ्या कुरवाळत..
त्यांचा मऊपणा शोधत राहते..
धुक्यांच्या दुलईत..
रस्त्त्यांवारल्या आवाजांत..
चुलीच्या धुरात..
गुरफटून घेते स्वताला,
भान हरपून गाणं गाते,
आणि सांडते लोकांच्या हास्यांत..
मावळत्या सूर्याला अर्घ्य दिलेल्या..
ओंजळीतल्या पाण्यात मिसळून जाते
अन् सागराच्या लाटांत..
हेलकावत राहते,
आकाशाने निळंभोर , चंदेरी वस्त्र पांघरल्यावर,
दमून भागून थकल्यावर..
शांतपणे रात्रीच्या कुशीत..
मऊ ढगांच्या ऊशीत,
निजून जाते..
पुन्हा नवीन स्वप्नं पाहण्यासाठी....

आपल्यासारखा...

आपल्यासारखा..
फुलांचा सहवास तर सर्वांनाच हवा असतो..
फुला सारखा एखादाच असतो |
चंद्रावरची स्वप्नं तर  सर्वच बघतात..
सुर्याकडे पाहून स्वप्नवेडा होणारा एखादाच असतो |
आकाश्याला गवसणी तर सर्वच घालतात..
आकाशा एवडा मोठा एखादाच असतो |
धेयाकड़े धावणारे तर सर्वच असतात..
धेय्य निर्माण करणारा एखादाच असतो |
 जगा सारखे तर सर्वच असतात..
आपल्यासारखा एखादाच असतो |