माणुस... एक रहस्यच !

हा प्रेमळ, ही रागीट, ही मनमिळाऊ, हा खडूस, हा एककल्ली , - अशा अनेक व्यक्तिविशेषणांनी आपण इतर व्यक्तींना वारंवार संबोधत असतो.

आपल्या नावापलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एक ओळख निर्माण करत असतो.


लोकांबरोबरच्या विविध अनुभवांनी ‘व्यक्ती’ म्हणून आपण समृद्ध होत असतो आणि अशा असंख्य ‘व्यक्तिवैशिष्टय़ांनी’ लोक आपल्याला आणि आपण लोकांना ओळखत असतो...!

मुळात मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.समूहात, समाजात इतर व्यक्तींबरोबर एकत्र राहण्याचा माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो.


अगदी रोजच्या दिवसाला आपण हजारो, लाखो व्यक्तींना बघत असतो, पन्नासेक लोकांशी संवाद साधतो, (फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटमुळे तर एकाच वेळी प्रचंड लोकांपर्यंत आपण पोहोचतो.)

मात्र त्यातले काहीच संवाद, काही घटना, काही व्यक्ती आपल्याला भावतात; नवीन विचार, नवीन दृष्टिकोन देण्यास प्रवृत्त करतात.


कधीतरी पाच मिनिटं भेटलेली व्यक्तीसुद्धा कायम स्मरणात राहते, तर कधी कधी रोजच्या संपर्कातली व्यक्तीसुद्धा परकी वाटते.

का घडतं असं? काही व्यक्तींशीच आपले सूर का जुळतात? आपल्याला आवडणारी व्यक्ती दुसऱ्याला आवडेलच असं नाही..


वर्षांनुवर्षांची मैत्री एका दिवसात कशी तुटते? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्याला सतावत असतात. प्रश्न जितके कठीण तितकीच त्यांची उत्तरंसुद्धा कठीणच..

कारण मुळात ‘व्यक्ती’ समजून घेणंच अत्यंत कठीण! खरं तर अशक्यच. पण जितका हा विषय गूढ आहे तितकाच तो मजेशीर आणि कुतूहल निर्माण करणारा आहे.

आयुष्य माझे... फक्त समाधान.

आयुष्य माझे... फक्त समाधान.

लहानपण म्हणजे फक्त धुडगूस !

खेळ हे एकच धेय्य..

चुकूनही शिवले नाही पेय्य...

फक्त जिंकण्यासाठी खेळायचं...

हार ही असू शकते हेच नाही कळायचं...


तरूणपणी देखील मित्रांसाठी,

केल्या ब-याच भानगडी... 

मारामारी करायला नाक-तोंड फोडायला,

असायची पहिली उडी...

दुस-यांसाठी केली लफडी,

स्वतःसाठी एकही नाही...

निस्वार्थपणे विश्वास जपायचा फक्त,

याशिवाय दुसरा स्वार्थ नाही...


आजही निरंतर असाच प्रवास आहे ...

बाकी काळजी माझ्या महादेवास आहे...

स्वाधीन करतो स्वतःला त्यांच्या,

जे मनात घर करतात...

धिक्कार करतो अश्याचा,

जे जाणीवेला सोडून संशयाचा कहर करतात...

--------------------------------------------------------------

एखादं झाडं जेव्हा बहर येऊन वाढत असताना आपल्याला दिसत असतं.

तर...

कधीकधी ते सुकल्यानंतर ही तटस्थ उभे असतं.

याचं गुपित त्याच्या मुळामध्ये असते. जे आपल्या दिसत नाही.


त्याच्या मुळांनी जमिनीला घट्ट मिठीत आवळून ठेवलेले असते. 

जमिनीने ही त्याला तसेच घट्ट मिठीत ठेवलेले असते.


आपल्यालाही झाडासारखं वागता आणि जगता आलं पाहिजे.

आपल्या मनाची मुळ आपल्या जीवनाच्या जमिनीत घट्ट असली पाहिजेत.


मग बहरायचं आणि नाही घाबरायचं.

तटस्थ असावं... मनाशी.

--------------------------------------------------------

तुम्ही सारे...वारे...वाहणारे !

जे श्वासात समाविष्ट होतील ते माझ्या जगण्याचा भाग होतील.

बाकीचे... इतडे तिकडे पसरणारच.

कारण, तुम्ही सारे...वारे.

वाहणारे !

काही बेधुंद दिशाहीन, काही अलवार स्पर्शणारे, काही बेसुमार घोघावणारे, 

काही वादळी विस्टकणारे , काही मंजुळ गुणगुणारे...

आपआपल्या गतीनृ आणि मितीने येणारे-जाणारे

तुम्ही सारे...वारे.

वाहणारे !

वाहणे तुमचा स्वभाव विशेष.

माझ्या श्वासात येतात ते संयमी वारे.

समाधानाने जगणारे आणि मला जगवणारे.

मग... मीही वाहत असतो माझ्यामधील वाऱ्यांसोबत !

----------------------------------------------

अडचण आणि चणचण... या दोघी जुळ्या बहिणी आहेत.

या प्रत्येकाच्या नशीबात येतात.

याच्याशी जुळवून घ्यायचं, मग याच आपल्याला जगायला शिकवतात.


वैताग आणि राग... हे दोघेही जुळे भाऊ आहेत.

हे देखील प्रत्येकाच्या नशीबात येतातच.

यांना समोपचाराने आणि संयमाने हाताळयचं मग हेच जिकांयला शिकवतात.


क्षणातलं - मनातलं!

चढ - उतार...

चढ-उतार... हे निसर्गाच्या सौंदर्यांचे वैशिष्ट्य आहे. यातच निसर्गाची ओळख आणि अस्तित्व सिद्ध होते.
माणसाच्या जीवनातील चढ-उतार ही त्याच्या जगण्याच वैशिष्ट्य असतं. आणि हेच चढ-उतार माणसाचे ओळख आणि अस्तित्व सिद्ध करतं.

---------------------------------------------------

माणूस, हा भुतलावरील एकमेव प्राणी आहे जो...
विश्वासघात सहज करतो.

बाकी पशू-पशी आणि वनस्पती याच्यांत विश्वासघात करण्याची प्रवृत्ती नसतेच.
त्यांच्या अलिखित अभ्यासात विश्वासघात नावाचा शब्द नाही.
---------------------------------------------------

एखादी चांगली गोष्ट सरळ मार्गाने होत नसेल तर, वाट वाकडी करून ती साध्य करण्यात अर्थ आहे.

पण उगाचच वाकड्यात जाऊन सरळ गोष्टी गुंतागुंतीच्या करणे निरर्थक असते.
----------------------------------------------------

आपण कोणाचं व्हायचं की कोणाला आपलं होऊ द्यायचं...
या दोन्हीही मध्ये आपण स्वतः महत्वाचे असते.

आपण कोणाचं व्हायचं... तर किती ?
कोणाला आपलं होऊ द्यायचं... तर किती ?

या किती मध्येच " व्यवहार " की " समर्पन " अवलंबून असते.
----------------------------------------------------

मला गाण्यातलं काही खास कळत नाही. 
त्यातील सरगम नेहमीच जिंकून जाते, रागाचे सूर कळत नाहीत.

आरोह-अवरोह तर कळतच नाहीत. 
पण आपल्याला गाणी ऐकताना जगायला आवडतात. 

गाणी ऐकताना काही मनात उमेद आणि आशेचे भाव उमटतात आणि तेच माझ्या समाधानाचं सूत्र बनत.
गाणी मनात नेहमीच गुंजन करत असतात.
------------------------------------------------

अलवारपणे करत स्वतःचा अस्त...
तो देतो रात्रीला रूप मस्त...

तेव्हा कुठे माणसाचा स्वार्थ होतो स्वस्त...
अन् सगळ्यांना झोप येते मस्त...

क्षणातलं - मनातलं...

माणसांच्या विचारांचा दोष की स्वभावाचा...जेव्हा,

माणसांच्या विचारांचा दोष की स्वभावाचा...जेव्हा,

काहींना मी भाषानिक वाटतो...


काहींना शोषनिक ही !

काहींना मी विचारांचा व्यसनिक वाटतो...


काहींना भावनांचा वासनिक ही !

काहींना मी अहंकारक वाटतो...


काहींना सहांरक ही !

काहींना मी गैरसोय वाटतो...


काहींना मी सोय ही ! 

काहींना मी अहीतदर्शक वाटतो...


काहींना आकर्षक ही !

काहींना मी व्यापारी वाटतो...


काहींना व्यवहारी ही !

काहींना मी पहिला वाटतो...


काहींना शेवटचा ही !

काहींना मी अगम्य वाटतो...


काहींना दुर्गम्य ही !

काहींना मी सहज वाटतो...


काहींना नेहमीच कठीण ही !

काहींना मी असाही वाटतो...


काहींना तसा ही !

मी फक्त मला वाटून देत नाही, कारण कोणाला काहीही वाटायला मी प्रदर्शनातली वस्तू नाही.

----------------------------------------


जेव्हा मनाचा मेळ नसतो....

तेव्हाच नात्याचा खेळ असतो...


जेव्हा पर्याय ठेवण्याची मनात भेळ असते...

तेव्हा जाणीवेने वागायला माणसाला वेळ नसते...

---------------------------------------------------


जे करता येत नाही ते बोलत बसू नये...

जे करता येते ते बोलण्याची गरज भासू नये.


जे करायचचं असेल तिथे आमंत्रणाची वाट बघत बसू नये.

जे करून झालयं त्यावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये.

जे करणं जरूरीचे आहे ते करायला उगाच वेळ वाढवू नये.

---------------------------------------------------


माणसाचा स्वभाव seasonal झालाय...

कधीतरी एकदाच भावनांचा ( मोहर ) बहरतो...


त्यांनतर अल्पकाळ टिकणारी स्वप्न ( फुले ) आणि अपेक्षा ( फळे ) वाढतात...

कालांतराने या हा मोहर , फुले आणि फळे निखळून जातात.


जमिन मात्र गळून पडलेल्या फळांना पुन्हा आपल्या कुशीत घेऊन गर्भात  रूजवते.

-----------------------------------------------------


अनेकांना निंदा करणाऱ्याचा राग येतो, प्रशंसा करणारे हवेहवेसे वाटतात.

खरतर...


आपल्यात जे नाहीच ते वाढवून सांगणारा प्रशंसक असतो.

जे खरं आहे आणि निच्छीत आहे त्याला प्रशंसेची आवश्यकता भासत नाही.


( सुर्य असतो का कधी प्रशंसेचा भुकेला ? )


खरी असो वा खोटी, स्वत:ची प्रशंसा अनेकांना आवडते.

प्रशंसेचे भुकेले नाहीत असे...अपवादात्मक !


बऱ्याचदा हिच प्रशंसा अहंकाराला पोशक असते.

अहंकार मोठा झाला की माणसाला छोटे करतोच.


क्षणातलं - मनातलं...

पुन्हा एक एल्गार होणं जरूरीचा आहे...

(सदर लेख वाचताना वाचकांनी लक्षात कुठेही माझा देश आणि संविधान याबद्दल मला निस्सिम प्रेम आणि आदर आहे. सादर केलेल्या आजच्या परिस्थिती बद्दलच्या मनातील व्यथा आहेत.)...

कधीकधी तळपायाची आग मस्तकात भिडते आणि फक्त दुःख होते
जेव्हा...
माझ्या सामान्य नजरेला दिसत कि माझा देश लयास लागत आहे.
अनेक महापुरूषांनी दिलेली निस्वार्थ प्राणांची आहुती व्यर्थ जाताना दिसते. महामानवाने अखंड तप करून लिहलेल्या ' सविंधान ' रूपी सत्य ग्रंथाला नाटयकथा म्हणून आपआपल्या पद्धतीने ' नाटकं ' करण्यास वापर होतोना दिसतो.

संविधानातून निर्मान झालेल्या सक्षम आणि निपक्ष: असलेल्या ' संसद ' रूपी न्यायमंचाला आज रंगमच बनवलेला दिसतो.
असे वाटते... न्यायमंचाच्या न्याय देवतेच्या तीक्ष्ण नजरेला उगाच काळ्या पट्टीनेबांधले आहे आणि तीच्या हाती आवश्यक असलेला न्यायाचा हातोडा डोळे असूनही आंधळ्यांच्या हाती दिला आहे.
जर न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी नसती तर... तिने कोणताही फैसला  - न्याय निर्णय प्रलंबित ठेवलाच नसता.
चोऱ्या-माऱ्या करणाऱ्याचे हात काळा पैसा ठेवणाऱ्यांचे हात चेचले असते...
हत्याकांड आणि आर्थिक घोटाळे  करून पळुन जाणाऱ्याचे पाय चेचले असते...

जन्मापासून अखंड निरंतर शोषण सहन करत आलेल्या आया-बहिणीच्या अब्रूला हात घालणाऱ्यांच्या पापी डोक्यांनाही जिथल्या तिथे फोडले असते.
पण तिलाच असहाय्य आणि निष्क्रिय बनवून ठेवले आहे या रंगमंचावर  ( न्यायमचं अर्थात... संसद ) काम करणाऱ्या मुखवटाधारी स्वार्थी  कलाकारानी.
या दुःखावर मलम म्हणूनच काम करण्याऐवजी आज पत्रकारीता आणि प्रसार माध्यमे ( so called social media ) देखील या नौटंकी करणाऱ्यांना प्रसिद्धी देण्यात आणि आपला TRP वाढवण्यात व्यस्त आहे.
ज्या पत्रकारीतेने एके काळी निरक्षरांना देखील सजान बनवले आज तीच पत्रकारीता असंख्य साक्षरांना केवळ मनोरंजन बनले आहे.
असं वाटतय... पुन्हा एक एल्गार होणं जरूरीचा आहे या जनतेचा !
हे सगळं बदलण्यासाठी.

क्षणातलं - मनातलं
(आज सकाळीच मनात आलेल वादळ)
---------------------------------------------------------------------------

स्वभावाची बाराखडी...

कोणाचा स्वभाव कष्टाळु असतो
कोणाचा स्वभाव खडूस असतो
कोणाचा स्वभाव गमतीदार असतो
कोणाचा स्वभाव घमेंडी असतो
कोणाचा स्वभाव चपळ असतो
कोणाचा स्वभाव छळ करणारा असतो
कोणाचा स्वभाव जखम देणारा असतो
कोणाचा स्वभाव झक मारणारा  असतो
कोणाचा स्वभाव टवाळ असतो
कोणाचा स्वभाव ठरवलेला असतो
कोणाचा स्वभाव डरपोक असतो
कोणाचा स्वभाव  ढवळा असतो
कोणाचा स्वभाव कारण असतो
कोणाचा स्वभाव तर्क लावाणारा असतो
कोणाचा स्वभाव थट्टा करणारा असतो
कोणाचा स्वभाव दर्शनीय  असतो
कोणाचा स्वभाव धर्मांद असतो
कोणाचा स्वभाव नरम असतो
कोणाचा स्वभाव पच्छाताप असतो
कोणाचा स्वभाव फसवणारा असतो
कोणाचा स्वभाव भडकवणारा असतो
कोणाचा स्वभाव मनमिळाऊ असतो
कोणाचा स्वभाव यथार्थ असतो
कोणाचा स्वभाव रमणीय असतो
कोणाचा स्वभाव लबाड असतो
कोणाचा स्वभाव वकिली असतो
कोणाचा स्वभाव शक्ती देणारा असतो
कोणाचा स्वभाव षंड असतो
कोणाचा स्वभाव स्पष्ट असतो
कोणाचा स्वभाव हळवा असतो
कोणाचा स्वभाव क्षणभंगूर असतो
कोणाचा स्वभाव त्रस्त असतो
कोणाचा स्वभाव यज्ञ असतो

क्षणातलं - मनातलं...
----------------------------------------

अडचणी , संकटे आणि कठीण प्रसंग हीच खरी जगण्याची सूत्र... 
आजन्म लक्षात राहील अशी शिकवण देणारी.
सुख हे नेहमी सुकेच असते...
दुःख नेहमीच ओले असते...
ओले होण्यासाठी अडचणी , संकटे आणि कठीण प्रसंग महत्त्वाचे!

सत्य जेव्हा फक्त गोड असतं...