आयुष्य माझे... फक्त समाधान.

आयुष्य माझे... फक्त समाधान.

लहानपण म्हणजे फक्त धुडगूस !

खेळ हे एकच धेय्य..

चुकूनही शिवले नाही पेय्य...

फक्त जिंकण्यासाठी खेळायचं...

हार ही असू शकते हेच नाही कळायचं...


तरूणपणी देखील मित्रांसाठी,

केल्या ब-याच भानगडी... 

मारामारी करायला नाक-तोंड फोडायला,

असायची पहिली उडी...

दुस-यांसाठी केली लफडी,

स्वतःसाठी एकही नाही...

निस्वार्थपणे विश्वास जपायचा फक्त,

याशिवाय दुसरा स्वार्थ नाही...


आजही निरंतर असाच प्रवास आहे ...

बाकी काळजी माझ्या महादेवास आहे...

स्वाधीन करतो स्वतःला त्यांच्या,

जे मनात घर करतात...

धिक्कार करतो अश्याचा,

जे जाणीवेला सोडून संशयाचा कहर करतात...

--------------------------------------------------------------

एखादं झाडं जेव्हा बहर येऊन वाढत असताना आपल्याला दिसत असतं.

तर...

कधीकधी ते सुकल्यानंतर ही तटस्थ उभे असतं.

याचं गुपित त्याच्या मुळामध्ये असते. जे आपल्या दिसत नाही.


त्याच्या मुळांनी जमिनीला घट्ट मिठीत आवळून ठेवलेले असते. 

जमिनीने ही त्याला तसेच घट्ट मिठीत ठेवलेले असते.


आपल्यालाही झाडासारखं वागता आणि जगता आलं पाहिजे.

आपल्या मनाची मुळ आपल्या जीवनाच्या जमिनीत घट्ट असली पाहिजेत.


मग बहरायचं आणि नाही घाबरायचं.

तटस्थ असावं... मनाशी.

--------------------------------------------------------

तुम्ही सारे...वारे...वाहणारे !

जे श्वासात समाविष्ट होतील ते माझ्या जगण्याचा भाग होतील.

बाकीचे... इतडे तिकडे पसरणारच.

कारण, तुम्ही सारे...वारे.

वाहणारे !

काही बेधुंद दिशाहीन, काही अलवार स्पर्शणारे, काही बेसुमार घोघावणारे, 

काही वादळी विस्टकणारे , काही मंजुळ गुणगुणारे...

आपआपल्या गतीनृ आणि मितीने येणारे-जाणारे

तुम्ही सारे...वारे.

वाहणारे !

वाहणे तुमचा स्वभाव विशेष.

माझ्या श्वासात येतात ते संयमी वारे.

समाधानाने जगणारे आणि मला जगवणारे.

मग... मीही वाहत असतो माझ्यामधील वाऱ्यांसोबत !

----------------------------------------------

अडचण आणि चणचण... या दोघी जुळ्या बहिणी आहेत.

या प्रत्येकाच्या नशीबात येतात.

याच्याशी जुळवून घ्यायचं, मग याच आपल्याला जगायला शिकवतात.


वैताग आणि राग... हे दोघेही जुळे भाऊ आहेत.

हे देखील प्रत्येकाच्या नशीबात येतातच.

यांना समोपचाराने आणि संयमाने हाताळयचं मग हेच जिकांयला शिकवतात.


क्षणातलं - मनातलं!

No comments:

Post a Comment