आयुष्यातील एखाद्या वळणावर...

आयुष्यातील एखाद्या वळणावर प्रत्येक माणूस वळतोच.

आणि....

स्वतःच्या समाधानासाठी कोणाबरोबर तरी खेळतोच.

खेळातही एकनिष्ठता असावी लागते. बाकी हार जीत तर होणारच असते.
------------------------------------------------

आपण स्वतःच्या बाबतीत जेवढ्या काळजीपूर्वक वागतो...
तसेच सर्वांच्या बाबतीत तेवढ्या  जाणीवपूर्वक वागत नाही....

याचे एकच कारण असते...

आपल्याला स्व जपता येतो पण...
सर्वस्व जपताना स्वार्थ आडवा येतो.
----------------------------------------------

एकटं बसून कधीतरी विचार करुन पहा........

आपण समोरच्या व्यक्तीबद्दल त्याच्या जागेवर जाऊन विचार करतो का ?

उत्तर नक्कीच " नाही " असे येईल...
कारण.... आपण आपल्या जागेवरून  सर्व तर्क आणि निर्णय घेत असतो.

आपल्याला जर आपली जागा आहे..
तर समोरच्या व्यक्तीला त्याची जागा असते हे आपण का विसरतो.
-----------------------------------------------------------------

शब्द आणि पाणी.....
सहज टाकता येतात.

पण...

ते सहज परत जमवनं अवघड असतं.
अर्थात ... दोन्ही जपून वापरा.

पाण्याचा उगाचच करु नये निचरा.
अन्...
शब्दांचा उगाचच करु नये कचरा.
----------------------------------

अचानक ....

जमीन बदलत नाही... पण रहिवास बदलतो.....
पाणी बदलत नाही.... पण रंग बदलतो.....

दिवस-राञ बदलत नाही.. पण ऋतू बदलतो.....
वेळ बदलत नाही... पण माणसं बदलतात.....
----------------------------------

आज सकाळीच म्हटलं देवाला.....
तु खुप चतुर आहेस...
तुला माहीतच आहे मी माझ्या माणसांना भेटायला आतूर आहे.
तरीही....
तु मला वाट बघायला लावतोस
अन् परीक्षा घेतोस..
मी देखील होईन पास ही परीक्षा
माझं नातं खास आहे पाहतील सर्व दिशा.....
-------------------------------------------

खूप कमी माणसांना प्रामाणिकपणे  स्वीकारता येते.....
स्वतःची .....चूक.
जाणीवेचीच कमी असते माणसांमध्ये समजण्यासाठी......
एखाद्याच्या मनाची...... भूक.
------------------------------------

कितीही असेल शांतता ..
माणसं करतातच माझ्या येण्यानं एकमेकांशी संवाद....
नाव जरी छोट माझं ...
करतो सर्वांना मी बाद...
येतो मी हळूच जरी नाही दिलीत साद...

नाही ओळखलतं... मी पाद.
------------------------------------

जे घर हौसे ने बांधलेले असते त्याला House म्हणतात.
ज्या घरात होम हवन चालतात त्याला home म्हणतात.

ज्या घरात हवा जास्त खेळती असते त्याला "हवेली" म्हणतात.
ज्या घराच्या भिंतीला सुद्धा कान असतात त्याला "मकान" म्हणतात.

ज्या घरात झोप चांगली येते त्याला "झोपडी" म्हणतात.

अन्
.
.
.
.
.
.
.
ज्या घरांचे हफ्ते फेडनू फेडून लोक आडवे होतात त्याला "फ्लॅट" म्हणतात.

पाहिलं ते लिहलं... मनोगत....

माझ्या मनातील विचार...

* मला क्षणात बदलत येत नाही, आणि...मनात तर जराही बदलता येत नाही.
* मला तर्क जरी लावायला आवडले, तरी....बेतर्क विचार करायला आवडत नाही.
* विचार करायला आवडते...पण....अविचारी वागायला आवडत नाही.
* मानात नाही ठेवलं कोणी...तरी...मनात राहणं नेहमी आवडत मला.
* कोणाच्याही आयुष्यात माझी कमी नसावी ......पण....पण जिथे कमी तिथे आम्ही याची हमी असावी.
* असं नाही की मी सर्वांमध्ये रमत नाही....खरंतर.....मला आपल्यांशिवाय कोणाबरोबर जमत नाही.
* तुम्ही आनंदानं मस्त बोलणं हेच माझं समाधान आहे....नाहीतर....आजकाल दुखः स्वस्त झालयं अन् संशयाला उधान आलं आहे.
* असचं सारं आयुष्य तुमच्या सावलीत असावं....अन् ....प्रत्येकाचं भविष्य अस्तित्व मार्ग माऊलीत असावं
* जन्माला येऊन माणसानं एक करावं.....एखाद्याच्या जीवनात आठवणीत तरी उरावं.
* प्रत्येकाचं स्वतंत्र मन असतं....त्यामुळे.... आपल्या मनासारखे इतरांनी वागावं हा विचार गौण आहे.
* उधळुन दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं.....कळू दे मला दुःख तुझ्या काळजामध्ये टोचलेलं.......
* कोणाला तरी सावरने फार सोपे असते....अवघड असते... स्वतःला सावरने, कारण....स्वतःला सावरताना आधार कोणाचाच नसतो.
--------------------------------------------------------------------------------------------

अंतर .....

दोन माणसं जोडतं आणि दोन माणसं तोडतं....
मनामध्ये आलेलं अंतर.....

एका जीवाला निर्माण करतं आणि दोन जीवांना वेगळं करत.....
बाईच्या बाळंतपणाच अंतर....

सृष्टीला निरंतर सहज आणि अलगद खेळवत असतं....
दिवस राञी मधलं अंतर.......

स्पर्धेतल्या प्रत्येक खेळाडूला नवी उमेद आणि आव्हान देत असतं....
विजय - पराजयातील अंतर......

जीवनाच्या प्रत्येक क्षणात आणि श्वासात ही असतं......
आत्मविश्वास अन् जिद्दीचे अंतर....

कधीच म्हणू नका..... नंतर...
कारण नंतर म्हणजे आपण जाणीवपूर्वक निर्माण केलेलं अंतर.
-------------------------------------------------------------

यातच त्यांचं महत्त्व कळतं.....

भावनांना मोजण्याचं परिमाण नाही,
मनातून ज्यांचा जन्म होतो,
अन् नात्याला नावं मिळतं,
यातच त्यांचं महत्त्व कळत.

आग , वारा आणि पाणी यांना मुक्त अवस्थेत मोजता येत नाही,
या शक्तींचे रूप म्हणजेच सृष्टी,
यांच्यावर जीवन आधारलेलं आहे,
यातच त्यांचं महत्त्व कळतं.

माणसानं अवकाश जिंकलं पण तिथं त्याला राज्य नाही करता आलं,
फक्त पृथ्वीवर वातावरण आहे,
आँक्सीजन हे सत्व फक्त हवेतच मिळतं,
यातच त्याच महत्त्व कळतं.

शरीरातील ह्दयदेखील कृत्रिम बनवलं,
पण नसानसात वाहणार रक्त नाही निर्माण करता आलं,
रक्त म्हणजे एकमाञ रहस्य आहे,
ते फक्त शरीरातंचं मिळतं,
यातच त्याच महत्व कळतं.
----------------------------------------------

जो जीव जन्माला येतो.....
तो मरेपर्यंत जगतोच.

सर्व जीवांमध्ये फक्त माणूसच...
स्वतःला निसर्गतः स्विकारत नाही.

सर्व जीव निसर्ग आणि वेळ...
यांच्या शृंगाराने नटतात.

फक्त माणूसच....
क्षणभंगूर नकली शृंगाराने स्वतःला नटवत असतो.
पण.. वेळ तो ही उतरवते.

माणसानं शरीर नटवण्यापेक्षा...
मनरुपी गाभारा सजवावा.
" वेळ " तेथे विश्रांती घेईल ...
अन् सैदव तुम्हाला साथ देईल.

मनोगत.......

का कळत नाही कधीकधी मनाला ?

अंथरूण पाहून पाय पसरावे...
दुखाःचे दिवस आठवणीत ठेवावे अन् सुखाचे दिवस विसरावे.
विसरावे अन् लक्षात ठेवावे कोणाला..
का कळत नाही कधीकधी मनाला ?

दिसतं तस नेहमीच नसतं.....
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा , का रे भुललासी वरीलीया अंगा.
नेहमी भूलुन जाऊ नये रंगा....
विसरु नये कधी आपल्या माणसाला..
का कळत नाही कधीकधी मनाला.
-----------------------------------------------

तर....

सगळं काही सहज असतं तर.....
प्रत्येक प्रश्नाला असलं असतं उत्तर.

सगळं काही सहज असतं तर....
प्रत्येकाने गाठले असते यशोशिखर.

सगळं काही सहज असतं तर....
मासे उडू शकले असते असून पर.

सगळं काही सहज असतं तर....
सर्वानाच मिळाला असता इच्छा पूर्तीचा वर.

सगळं काही सहज असतं तर....
जन्माला असता इथं मादी विना नर.

सगळं काही सहज असतं तर....
-----------------------------------

'वाद'आणि 'चर्चा' यात 'फरक' काय..?

वादातून  'भांडणं'  होतात;
चर्चेतून 'गोष्टी स्पष्ट' होतात.

वाद "अहंकार आणि  संकुचित  मनातून" होतो;
तर चर्चा 'मोकळ्या मनातून' होते.....

वादात 'अज्ञानाची देवाणघेवाण' होते,
तर चर्चेत 'ज्ञानाची देवाणघेवाण''होते.

वाद ही 'रागाची अभिव्यक्ती'आहे;
तर 'चर्चा'ही'तर्काची अभिव्यक्ती'आहे...

'' वादातून कोण बरोबर हे "सिध्द  करण्याचा प्रयत्न होतो"
तर 'चर्चेतून'काय "बरोबर हे सिध्द करण्याचा" प्रयत्न होतो

वाद "निरर्थकच" असतो..

"वादा"पेक्षा 'चर्चेने' आणि 'चर्चे' पेक्षा,
"संवादाने" प्रश्न "मार्गी" लागतात
-----------------------------------------

 बाकी सर्व ठीक आहे....

चेहऱ्यावर प्रेमाचे भाव अन् मनात काळा डाव....
असा नात्याचां सध्या व्यवहार आहे.
बाकी सर्व ठीकआहे.

कोणाच्या तरी समाधानासाठी अन् मन मारुन रहायाचे त्याच्यासाठी...
अशी जगण्याची रीत आहे.
बाकी सर्व ठीक आहे.

माणूस माणसाशी बोलेना अन् पावालो पावली करतोय तूलना...
माझंच नसीब फाटक आहे.
बाकी सर्व ठीक आहे.
--------------------------------------------

मी म्हटलं ....मस्त आहे .

ती त्या दिवशी त्याच्याकडे हट्ट करुन बसली.... तो म्हणाला जा मग.
दुसऱ्या दिवशी ती दुसऱ्या बरोबर दिसली.
आयला ... प्रेम एवढं स्वस्त आहे.
मी म्हटलं ...... मस्त आहे.

कालच बस स्टाँपवर एका  जोडप्याचं भांडण पाहील...
रागानं तीनं मंगळसूञ काढून त्याच्या तोंडावर मारलं.
साँलीड यार...लग्न एवढं स्वस्त आहे.
मी म्हटलं ..... मस्त आहे.

सकाळीच सगळीकडे कूजबुज सुरु होती.राञीच सासू - सूनेचं म्हणे भांडण झालं होतं.
अन् मुलानं आईचचं म्हणनं ऐकलं ..
म्हणून बायकोनं विष प्यालं.
आईशप्पथ असा....वाया घालवण्या इतका जन्म स्वस्त आहे....
मी म्हटलं ...... मस्त आहे.
-----------------------------------------------------------------------

वेळ ....

वेळ.......हळूवार असते.
जेव्हा तुम्ही वाट पाहत असता.

वेळ.......जलद असते.
जेव्हा तुम्हाला उशीर झालेला असतो.

वेळ.......ञासदायक असते.
जेव्हा तुम्ही दुःखी असता.

वेळ....कमी असते.
जेव्हा तुम्ही आनंदी असता.

वेळ.... जास्त असते.
जेव्हा तुम्ही कंटाळलेले असता.

खरंतर.......
प्रत्येक वेळी ...... वेळ तुम्ही तुमच्या भावना आणि मानसिकता यानुसार तुमच्या सोयीने ठरवता.

वेळ बदलत नाही... माणसं बदलतात

मनोगत.......😊