आपल म्हणणं सगळ्यांना पटलं पाहिजे, आपल्या मर्जी नूसार आपलं माणूस नटलं पाहिजे.
आपलीच जागा असावी पहिली त्याच्या ध्यानी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
आपण जेवढा जीव लावला आहे त्याच्यावर, त्याची जाणीव असावी त्याच्या मनी.
प्रेमानं हलकच जवळ घ्याव त्यानं आपल्या दुःखाच्या क्षणी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
कठीण परिस्थितीचं उन्हात नकळत त्याची सावली आपल्यावर पडावी.
डोळ्यांतील अश्रू ओघळण्याआधी टीपावं त्यानी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
एकांतात असताना आपण सुखावून जाव्यात फक्त त्याच्या गोड आठवणी.
दूर असतानाही चिञ आपले सहज यावे त्याच्या नयनी...
यापेक्षा जास्त अपेक्षा करत नाही कोणी ?
---------------------------
सगळं काही गुपीत आहे...जणू अत्तर मनाच्या कुपीत आहे.
चेहरा कितीही तेजस्वी असला तरी...मेंदू संशयाच्या अंधाराने शापीत आहे.

शरीरं म्हणजे मृगजळ फसवं...भावनांच रूप डोळ्यांतील आसवं.

आपले " प्रेम " ज्याच्यावर आहे हे त्या व्यक्तीला माहीत असणे जरूरीचे असते... पण त्यासाठी त्याचं प्रदर्शन जरूरीचे नसते.
जसं जगण्यासाठी लागणाऱ्या श्वासाचं आणि शरीरातील रक्ताचं महत्व असतं तसचं निखळ " प्रेम " ही असावं.
प्रत्यक्षात प्रेम ही शाश्वत आणि शुद्ध भावना आहे परंतू जेव्हा लाज, ईर्शा, अहंकार, अविश्वास, संशय, स्वार्थ, अपेक्षा या विषाणुजन्य दुर्गुणांची बाधा होते तेव्हा प्रेम अशुद्ध होते.
---------------------------
माणसं नेहमी फक्त स्वतःच्या सोयीने अर्थ शोधत असतात.
साजस चेहऱ्याने मनात धूर्त काव्याने स्वार्थ शोधत असतात.
मी असं नाही म्हटलं की.... माणसानं स्वतःच भलं साधू नये.
फक्त स्वार्थ साधताना होऊ नये की, आपल्या आजूबाजूला कोणी उरू नये.
---------------------------
व्यक्त आणि अव्यक्त दोन्हीही भावना योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार. अपेक्षित आणि अनपेक्षित दोन्हीही घटना योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
समर्थ आणि असमर्थ दोन्हीही स्वभाव योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
मान आणि अपमान दोन्हीही आदर योग्य अयोग्य असतात... वेळेनूसार.
---------------------------
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.......अन्
खोटे मुखवटे पांघरूण आजूबाजूला वावरणाऱ्या सांऱ्यांना एका क्षणात मनाच्या हद्दपार करावसं वाटतं....

भावनांशी खेळ करून नात्यांवर डाव मांडणाऱ्या सांऱ्यांना एका क्षणात चित्त करावसं वाटतं.....

जाणीवेची लक्तरे अविश्वासाच्या वेशीवर टांगणाऱ्या सांऱ्यांना नामशेष करावसं वाटतं..

स्वतःला सगळ्यातून वेगळ करून एकांतात अलिप्त रहावसं वाटतं.
कधी कधी मनाला एक भयंकर विचारांचं वादळ गाठतं.
---------------------------
हळूहळू वय निघून जातं...जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते...कधी कुणाची आठवण मनाला सुखावते.
आठवणींच्या आधारावर जीवन वेल बहरत जाते...वेलीला कधी फांद्या येत नाहीत..
सागराचा खजाना किनाऱ्यावर नाही येत...तोडलेली नाती जीवनात पुन्हा जुळून येत नाहीत.
---------------------------
कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना.....
कणखर आहेस तरी असा का बरं असा अधीर होतोस ?
सर्व काही नीट ठरवलंं आहेस तरी छोटया अपेक्षांत बधीर होतोस.
कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना.....
तटस्थ आहेस तरी का बरं असा भावनांनी भारावून जातोस ?
म्हणतोस मी राजा आहे तरी अचानक का बरं गुलाम होतोस.
कधीतरी सावर मना, स्वतःला आवर मना....
---------------------------
मनातील भावना...
* सगळं ठरवता येत प्रत्येकाला जेव्हा स्वतःशिवाय बाकी सर्व शून्य असतं. पण अशीही वेळ येते जेव्हा शून्य महत्वाचे असतात.
कारण शून्याने संख्येचा पट वाढतो आणि माणसातील शून्याने गट वाढतो.
* राज्य तर मी ही करतो....माझ्यावर प्रेम करणाऱ्याच्या " मनावर " आणि तिरस्कार करणाऱ्याच्या " मेंदूवर "
* आयुष्यात काही कोणाला देता आलं नाही तरी "विश्वास" नक्कीच देता येतो...कारण तो जपणं आणि तोडणं हे फक्त आपल्यावर अवलंबून असतं.
* अविश्वासाच्या भोवऱ्यात" आणि "संशयांच्या वलयात" नाती विस्कटू देऊ नका. अर्थहीन क्षणभंगुर सुखानं भारावून जाऊ नका.
शब्दांत वचन देणं सर्वांनाच येतं, दिलेला शब्द पाळणं काहींनाच येतं.
* शब्द निर्जिव असूनही सजीव माणसानां शिकवतात... पण माणसं एवढी धूर्त असतात की शब्दांशी ही खेळतात.
आपण पुढं चालतो ठेऊन आंधळा विश्वास अन् ती माञ सोयीस्कर स्वार्थाच्या वळणावर वळतात.
* "नातं" हा शब्द जुळणं जेवढं सोप आहे, ते जपणं ही कठीण असतं. "नातं" हा शब्द बोलणं जेवढा सोपं आहे, ते समजणं ही कठीण आहे.
"नातं" या शब्दाची उणीव भासेल, जेव्हा तुम्हाला त्याची जाणीव नसेल.
* निस्वार्थ बुद्धीने आणि निर्मळ नजरेनं पाहिलं तर सारं "मस्त" असतं. फक्त आपल्या मनासारखं नसलं की "अस्वस्थ" भासतं.
* जन्म हा जगण्यासाठीच होतो, फक्त जगताना जाणीव असणं जरूरीचं असतं कारण जगणं जाणीवेने पूर्णत्वास जातं.
* नक्की काय मिळवतात माणसं ? जीवापाड जपणाऱ्या एखाद्याला सहज फसवून नक्की काय मिळवतात माणसं....
आंधळा विश्वास ठेऊन सर्वस्व देणाऱ्या एखाद्याला सहज फसवूण नक्की काय मिळवतात माणसं.
* वस्तू कालबाह्य असतात हे ऐकले होते, पण विश्वास देखील कालबाह्य असू शकतो या अनुभवाने मनाला दुःख झाले.
मनोगत...

No comments:
Post a Comment