माणुस... एक रहस्यच !

हा प्रेमळ, ही रागीट, ही मनमिळाऊ, हा खडूस, हा एककल्ली , - अशा अनेक व्यक्तिविशेषणांनी आपण इतर व्यक्तींना वारंवार संबोधत असतो.

आपल्या नावापलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एक ओळख निर्माण करत असतो.


लोकांबरोबरच्या विविध अनुभवांनी ‘व्यक्ती’ म्हणून आपण समृद्ध होत असतो आणि अशा असंख्य ‘व्यक्तिवैशिष्टय़ांनी’ लोक आपल्याला आणि आपण लोकांना ओळखत असतो...!

मुळात मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.समूहात, समाजात इतर व्यक्तींबरोबर एकत्र राहण्याचा माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो.


अगदी रोजच्या दिवसाला आपण हजारो, लाखो व्यक्तींना बघत असतो, पन्नासेक लोकांशी संवाद साधतो, (फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटमुळे तर एकाच वेळी प्रचंड लोकांपर्यंत आपण पोहोचतो.)

मात्र त्यातले काहीच संवाद, काही घटना, काही व्यक्ती आपल्याला भावतात; नवीन विचार, नवीन दृष्टिकोन देण्यास प्रवृत्त करतात.


कधीतरी पाच मिनिटं भेटलेली व्यक्तीसुद्धा कायम स्मरणात राहते, तर कधी कधी रोजच्या संपर्कातली व्यक्तीसुद्धा परकी वाटते.

का घडतं असं? काही व्यक्तींशीच आपले सूर का जुळतात? आपल्याला आवडणारी व्यक्ती दुसऱ्याला आवडेलच असं नाही..


वर्षांनुवर्षांची मैत्री एका दिवसात कशी तुटते? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्याला सतावत असतात. प्रश्न जितके कठीण तितकीच त्यांची उत्तरंसुद्धा कठीणच..

कारण मुळात ‘व्यक्ती’ समजून घेणंच अत्यंत कठीण! खरं तर अशक्यच. पण जितका हा विषय गूढ आहे तितकाच तो मजेशीर आणि कुतूहल निर्माण करणारा आहे.

आयुष्य माझे... फक्त समाधान.

आयुष्य माझे... फक्त समाधान.

लहानपण म्हणजे फक्त धुडगूस !

खेळ हे एकच धेय्य..

चुकूनही शिवले नाही पेय्य...

फक्त जिंकण्यासाठी खेळायचं...

हार ही असू शकते हेच नाही कळायचं...


तरूणपणी देखील मित्रांसाठी,

केल्या ब-याच भानगडी... 

मारामारी करायला नाक-तोंड फोडायला,

असायची पहिली उडी...

दुस-यांसाठी केली लफडी,

स्वतःसाठी एकही नाही...

निस्वार्थपणे विश्वास जपायचा फक्त,

याशिवाय दुसरा स्वार्थ नाही...


आजही निरंतर असाच प्रवास आहे ...

बाकी काळजी माझ्या महादेवास आहे...

स्वाधीन करतो स्वतःला त्यांच्या,

जे मनात घर करतात...

धिक्कार करतो अश्याचा,

जे जाणीवेला सोडून संशयाचा कहर करतात...

--------------------------------------------------------------

एखादं झाडं जेव्हा बहर येऊन वाढत असताना आपल्याला दिसत असतं.

तर...

कधीकधी ते सुकल्यानंतर ही तटस्थ उभे असतं.

याचं गुपित त्याच्या मुळामध्ये असते. जे आपल्या दिसत नाही.


त्याच्या मुळांनी जमिनीला घट्ट मिठीत आवळून ठेवलेले असते. 

जमिनीने ही त्याला तसेच घट्ट मिठीत ठेवलेले असते.


आपल्यालाही झाडासारखं वागता आणि जगता आलं पाहिजे.

आपल्या मनाची मुळ आपल्या जीवनाच्या जमिनीत घट्ट असली पाहिजेत.


मग बहरायचं आणि नाही घाबरायचं.

तटस्थ असावं... मनाशी.

--------------------------------------------------------

तुम्ही सारे...वारे...वाहणारे !

जे श्वासात समाविष्ट होतील ते माझ्या जगण्याचा भाग होतील.

बाकीचे... इतडे तिकडे पसरणारच.

कारण, तुम्ही सारे...वारे.

वाहणारे !

काही बेधुंद दिशाहीन, काही अलवार स्पर्शणारे, काही बेसुमार घोघावणारे, 

काही वादळी विस्टकणारे , काही मंजुळ गुणगुणारे...

आपआपल्या गतीनृ आणि मितीने येणारे-जाणारे

तुम्ही सारे...वारे.

वाहणारे !

वाहणे तुमचा स्वभाव विशेष.

माझ्या श्वासात येतात ते संयमी वारे.

समाधानाने जगणारे आणि मला जगवणारे.

मग... मीही वाहत असतो माझ्यामधील वाऱ्यांसोबत !

----------------------------------------------

अडचण आणि चणचण... या दोघी जुळ्या बहिणी आहेत.

या प्रत्येकाच्या नशीबात येतात.

याच्याशी जुळवून घ्यायचं, मग याच आपल्याला जगायला शिकवतात.


वैताग आणि राग... हे दोघेही जुळे भाऊ आहेत.

हे देखील प्रत्येकाच्या नशीबात येतातच.

यांना समोपचाराने आणि संयमाने हाताळयचं मग हेच जिकांयला शिकवतात.


क्षणातलं - मनातलं!