सगळ्यांनाच येत नाही.....

शब्द लिहिणे सोपे ,
शब्द वाचने सोपे ,
पण दिलेला शब्द पाळणे
सगळ्यांनाच येत नाही.

एखाद्याला स्वीकारणे सोपे ,
एखाद्याला नाकारणे सोपे ,
पण एखाद्याशी एकनिष्ठतेने राहणे
सगळ्यांनाच येत नाही.

कधीकधी सहज असते हसवने ,
कधीकधी सहज असते रडवने ,
पण एखाद्याचं आयुष्य घडवने
सगळ्यांनाच येत नाही.

विचारांची दिशा बदलता येते ,
आचारांची पद्धत बदलता येते ,
पण स्वतःचा स्वभाव बदलने
सगळ्यांनाच येत नाही.

निर्णय देणे शक्य असते ,
निर्णय घेणे शक्य असते ,
झालेल्या निर्णयाला सहज स्विकारणे
सगळ्यांनाच येत नाही.

पळून जाणे कोणालाही येतं ,
लपून राहणे कोणालाही येतं ,
पण तटस्थपणे सामोरे जाणं
सगळ्यांनाच येत नाही.
------------------------------------

फाँर्वड प्रेम....

काय म्हणे तर आम्ही प्रेम करतो एकमेकांवर ....

साला सगळं काही उदारीवर,
आईबापाच्या कमाईवर.
काय म्हणे तर.....

आत्मिक तर नसतच,
सर्वकाही शरीराच्या देखाव्यावर.
काय म्हणे तर.....

थोरा-मोठ्याचं भान सोडून,
प्रदर्शन भर रस्त्यावर.
काय म्हणे तर.....

भावनांचा अश्लील बाजार,
आवर नाही मनावर.
काय म्हणे तर .......

आजकाल प्रेम ....प्रेम नाही व्यसन झालायं.....
एकानं केली  कि दुसऱ्यांनी करायची अशी फँशन झालयं.
--------------------------------------------------------

कधीतरी आपणही !

एकदा मनापासून पहावं रुसून.....
कोणीतरी समजून घेतयं का आपल्याला जवळ बसून.

कधीतरी आपणही
एकटच रहावं.....
कोणीतरी न बोलवताही सोबत करतयं का पहावं.

कधीतरी आपणही
सारे बंध तोडून जगावं....
आपल्या मनाला वाटेल तसे बिनधास्त रहावं.

कधीतरी आपणही
कोणाचं तरी व्हावं....
त्यानं न मागता ही त्याला मनभरुन सुख द्यावं.
----------------------------------------------

भेटलाच जर देव कुठे तर विचारेन....

पुन्हा एकदा मिळेल का लहानपन ?

खरंच किती छान होतं आईला घट्ट मिठी मारून राहनं...
आता क्वचितच होत तिला पाहनं.
आठवण आली तीची की ...
भरुन येत मन.

भेटलाच जर देव कुठे तर विचारेन...
पुन्हा एकदा मिळेल का लहानपन.

लहानपणीची मैञी म्हणजे फक्त मजा..
अभ्यास असला तरी येई उन्हाळी रजा...
जबाबदारी काहीच नाही ....
सारे आनंदाचे क्षण....

भेटलाच देव कुठे तर विचारेन...
पुन्हा एकदा मिळेल का लहानपन.

मनात येईल ते हट्ट करुन मागावं..
आपण नकळत झोपलो की कुणीतरी अंगावर टाकावं..
सर्दी झाली... ठेच लागली तरी....
काळजी घेतो प्रत्येकजन..

भेटलाच  देव कुठे तर विचारेन...
पुन्हा एकदा मिळेल का लहानपन.
-------------------------------------

नात्याला नाव नसावे.....

सांगत असते "नाते"
नाव नाही मला...... ना...हे....ना...ते
जे तुम्हाला वाटते.....
म्हणूनच नात्याला नाव नसावे.

नात्याला नाव दिले की....
लोक त्याला नाव ठेवायला लागतात.
म्हणूनच नात्याला नाव नसावे.

झाड आणि सूर्याच्या नात्याला ...
अग्नी आणि हवेच्या नात्याला....
पाणी आणि जमिनीच्या नात्याला...
नाव नाही तरी ही नाती पवित्र आहेत.
म्हणूनच नात्याला नाव नसावे.

मन दिसत नाही म्हणून ते पविञ आहे....त्यात परमेश्वर आहे.
नाते मनातून जोडलेले असेल तर ते इतर कोणालाही न दिसलेले बरे असते.
लोकांच्या नजरा नात्याला लगेचच लागतात..... त्यामुळे
नाते मनात जपून पविञ ठेवावे.
म्हणूनच नात्याला नाव नसावे.

मनोगत......😊

No comments:

Post a Comment