मन अपंग झालं की...

मन अपंग झालं की...
माणसं सहज अंग काढतात.

त्यामुळे ....

शरीर अपंग झालं तरी ....
मन कधी अपंग होऊ देऊ नका.

मनाचे अपंगत्व म्हणजे लाचारी ज्यामध्ये माणसाला किंमत नसते.
-------------------------------------------


वेळेने एकदा विचारले......

तू नेहमी सांगतोस तुझी काळजी करणारी आणि तुझ्या मनात असलेली काही माणसंआहेत.....

कळू दे तरी मला एखाद्याबद्दल ...

मी... हसतच उत्तर दिले.

हा मेसेज वाचणार्या माणसालाच विचार.... माझ्याबद्दल.
-------------------------------------------

अपेक्षाच्या बीज
भावनेच्या पाण्याने मोड धरते...

म्हणूनच भावनांच्या पावसाला
अपेक्षाच्या शेतात पडू देऊ नये.

जर बीज रुजलेच
तर वेळीच त्याचा मोडून खूडुन टाका.

जेणे करुन दुखाःचे कुरण वाढणार नाही....
-------------------------------------------

नक्की कशासाठी.....

कोणी अमाप पैसा कमवायला धडपडत आहे.

तर

कोणी भरपूर सोने संप्पती जमवायला धडपडत आहे.

यातलं काहीच लागत नाही मनाच्या समाधानासाठी....
मग हे सर्व नक्की कशासाठी ?
-------------------------------------------

माणसाला माणूस का बनता येत नाही....

लोह वितळून हत्यार बनते.....

सोने वितळून अलंकार बनते.....

बाष्प वितळून जीवन बनते.....

पण आज....

माणसाचे मन वितळून माणूसकी बनने कठीन झाले आहे.
-------------------------------------------

माणूस हरवलाय.....

साधनांच्या बाजारात भोगवादी झालायं.....
माणूस हरवलाय.

सारंकाही तो आता पैशात मोजू लागलाय.....
माणूस हरवलाय.

शरीर नटवण्यात तो मनात विस्कटलाय....
माणूस हरवलाय.

बँकेचे खाते भरताना तो नाते विसरलाय....
माणूस हरवलाय.
-------------------------------------------

कधी तरी....

सगळेच नेहामी आपल्या मनासारखे असेल.... असे नसते.
योग्य असला तुम्ही जरी .....वेळ नसेल तुमच्या बरोबर.....
कधी तरी.

रोजच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात... आणि जातात.
तसेच सगळे असले आपल्या सोबत आज जरी...सोईने वेगळे होतील ते ..
कधी तरी.
-------------------------------------------

माणसाला जाणीव असावी...

आपल्या आयुष्यातील उणीव ....
कोणीतरी नकळत भरुन काढावी.
अनपेक्षित काळजीची...
माणसाला जाणीव असावी.

आपल्यावर केलेलं निरागस प्रेम ...
रक्तातील किंवा जोडलेल्या नात्याचे.
त्यातील शुद्ध भावनेची....
माणसाला जाणीव असावी.
-------------------------------------------


कधी कधी वाटते मला.....

काळजी करणे नसते माणसाच्या स्वभावात,
ते लादले आहे नातेरुपी नियमाने..
रक्ताची नाती असतात जन्मजात,
अन् लग्नाची बेडी बांधली देवाने....

कधी कधी वाटते मला.......
बांधून ठेवतात माणसाला फक्त  समाजाची  नितिमुल्य,
खरंतर...
आईच्या गर्भाची नाळ एकच पविञ,
त्यानंतर बांधते माणसाला मंगळसूञ.

कधी कधी वाटते मला......
नाती म्हणजे फक्त सोय वाटते,
कारण ........
माणसाला एकटेपणाचं भय वाटते.

कधी कधी वाटते मला.....
प्रत्यक्षात माणूस असतो सुरक्षित फक्त .....
जन्माआधी आईच्या गर्भात आणि मृत्यूनंतर जमिनीच्या गर्भात.
-----------------------------------------------------------------------

शपथ आणि आश्वासन ......

भावनेने घेतली जाते ती शपथ
अन्......
विचार करुन दिले जाते आश्वासन.

शपथ कदाचित शुद्ध असायची ...
म्हणूनच माणसं ... आई किंवा देवा शपथ म्हणतात.
शपथेत फसवणूक नसायची.

आश्वासन हे अर्थात promise ...
हे miss करण्यासाठीच असते.
म्हणूनच त्याची शाश्वती नसते.

पण.....
आजकाल माणसं दोन्हीही सहज तोडतात. त्यामुळेच शपथ आणि आश्वासन यात नाती टिकत नाहीत.

माणसानं विसरु नये शपथ आणि आश्वासन जनावरं देत नाहीत.

म्हणूनच... ती माणसांसारखी कोणाची फसवणूक करत नाहीत.
मनोगत.......

No comments:

Post a Comment