तेव्हा काय करायचं?

कोणीतरी आपलं जेव्हा रागात  असतं, आपल्या जवळ असूनही स्वतःच्याच जगात असतं,
म्हणून आपलं काय चूकलं हा विचार करत डोकं खराब नाही करायचं.
बावरुन तर जराही नाही जायचं. समजूतदारपणे त्यास सावरून  घ्यायचं, विस्कटलेलं नातं आवरून वागायचं.
-----------------------------------------------------------------

हरलवलेली कोणतीही गोष्ट त्याच ठीकाणी मिळते किंवा नवीन घेता येते. फक्त " विश्वास " परत मिळवणे कठीन असते.
-----------------------------------------------------------------

आयुष्यात आणि भाष्यात गोडी असेल तर...समाधानाची थोडी ही कमी भासणार नाही.
-----------------------------------------------------------------

आता बाहेर पहीलत तर सूर्य दिसणार नाही.... पण तो आहे.
आता मी ही तुम्हाला दिसत नाही...पण मी तुमच्या सोबत आहे.
सूर्य कुठेही असला तरी त्याला आपला मानलं तर तो आपला असतो. तसंच ....
-----------------------------------------------------------------

एखाद्याचा आदर करणे, हे केवळ भांडवल नाही...तर व्याजासहीत परत मिळणारी गुंतवणूक आहे.
-----------------------------------------------------------------

शिक्षण म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी लागाणारे प्रमाणपञ किंवा पदवी नाही...तर          
तुमचा इतरांबरोबर वागण्याची पद्धत, संस्कार, स्वभाव आणि एकनिष्ठता यांचा सारांश आहे.
-----------------------------------------------------------------

जेव्हा माणसाजवळ सौंदर्याचा रंग असतो...तेव्हा तुम्हाला  पाहीजे त्यांचा संग असतो.
रंग उतरला की, लोक अंग काढायला सुरूवात करतात.
-----------------------------------------------------------------

कालच मला विचारत होतं मन , खरं खरं सांग?...
मला ओळखतं का रे तुझं कोण. मी म्हटलं वेड्या मना...
तु असा रे कसा? कोणी नाही ओळखले तरी मी तुला विसरू कसा.                  
पण एक गोष्ट खरी सांगू ....जे तुला ओळखतात फक्त तेच मला संभाळतात.
तुझ्यामुळेच तर "मी* मी आहे....तु आहेस तर मला काय भी (भीती) आहे.
त्यामुळे तुला कोण ओळखत याची मी चिंता करत नाही. अन्....उगाचच कोणालाही तुझ्यामध्ये भरत नाही.
-----------------------------------------------------------------

आताही पाऊस आला आहे...... 
माणसानं त्याच्या मुळांवर घाव घालूनही तो न रुसता भरला आहे.....
मानसालाही पावसासारखं मोठ्या मनाचं होता आलं तर.......
ज्याला आपण कळत-नकळत दुःख दिलं , त्याच्यावर आपूलकीनं बरसता आलं तर.....
सुकलेली मनाची जमीन आनंद अश्रूंनी ओली करता आली तर...
मनात पेरलेल्या भावनारूपी बीजांला पुन्हा स्वप्नांचे अंकुर येतील अन् नात्यांची फूलांनी जीवनाची बाग बहरुन जाईल.
-----------------------------------------------------------------

असे वाटते शब्दांच्या पावसात मनसोक्त भिजावं...
अन् असंच कधीकधी विचारांचं बीज रूजावं...
वार्यासारखं मनसोक्त बेभान वहावं....अन् निरतंर तुमच्या श्वासात रहावं.
-----------------------------------------------------------------

अशी असते सवय...
यासाठी जरुरी नसते कोणाचेही वय. ज्यामध्ये वाटत नाही कशाचेही भय.
डोक्यात शिरली तर, येड लावते लय. काहीही असते कोणाकोणाची सवय.
-----------------------------------------------------------------

नेहमी सारखं आजही प्रत्येकाला जगायचं आहे.
मी आजही तुझ्यासोबत आहे हे वेळेला सांगायचं आहे.
आपल्या मर्यादेत वागायचं आहे. पण ...आपल्या हक्काचं मागायचं आहे.
-----------------------------------------------------------------

तडजोड - मोडतोड
माणसाच्या जीवनाला तडजोडीने अर्थ येतो, दुःखाच्या तड्याला सुखाची जोड दिल्यावर.
अन् ...जीवन निर्रथक होतं, मोडतोडीने जेव्हा संशयाला मोड येतो विश्वासाला तोड दिल्यावर.
-----------------------------------------------------------------

मंथन...
या शब्दाचा अर्थबोध झाल्यावर कळते की समुद्र मंथनातुन अमृत आणि वीष का निर्माण झाले...
मंथनातील अमृत-वीष आणि  मन-तन (मंथन) हे सार आहे. अमृत म्हणजे मन आणि वीष म्हणजे तन.
मन जे अमृतापरी नेहमी पविञ आणि तन हे वीषापरी नाशिवंत. मन अमृतासारखे चिरतरूण आणि मन वीषासारखे कालांतराने भेदक.
अर्थात ...
समुद्र मंथनातील वीषप्राशन करून महादेवांनी देवलोक तारला होता. पण जीवन मंथनातील तन रुपी वीषाच्या अहंकारात बुडून  माणसानं विश्वास मारला आहे.
लक्षात असू द्या, जे जपलं ते आपलं...
-----------------------------------------------------------------

याशिवाय आणखीन काय मागेल माझं मन....
विश्वासाचे पंख लावून घ्यावी तुम्ही यशाची असमान भरारी,
अन् आनंदाने परत यावे अस्तित्व मार्ग च्या शिवारी. हक्काने बसावे आपल्या जागेवर...
तुम्हाला अडवणार कोण? याशिवाय आणखीन काय...
आकाशाला भिडले जरी उद्या तुमचे हात...आपल्यानां नेहमी लाभावी तुमची साथ.
"तन" बदलता येत नाही कोणालाही सापासारखी टाकून कात. नाती जपा मनाची करु नका घात.
माझ्या रोमरोमात असावे आजन्म तुम्हीपण....याशिवाय आणखीन काय...
-----------------------------------------------------------------

असा एक दिवस यावा...
तुमच्या इच्छा पूर्तीचा मान मला मिळावा.
असा एक क्षण यावा...
तुमच्या पोटी पुन्हा एकदा जन्म व्हावा.

मनोगत...

एकदा वेळेला मी विचारलं ....

तु कधी माझ्यासाठी रडली आहेस का ?              
ती म्हणाली ....हो एकदा रडली आहे.
मी आच्छर्यचकती होऊन उत्सुकतेने  म्हणालो कधी गं.......                    
ती म्हणाली आठव जरा... एकदा मी तुझ्या समोर पैसे , पेन आणि खेळणे ठेवले होते.. आणि तुला म्हणाले, घे काय पाहिजे ते ?
तु त्या तिन्ही वस्तू न्याहाळून पाहत होतास...
अन् मी तुझ्याकडे पाहत होते. कारण ती तुझी परिक्षा होती... की भविष्यात तु काय करणार आहेस.              
तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतोस.
जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होते. मला बघायची होती तुझी निवड.
तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतास आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होते.
तु रांगत रांगत पुढे आलास, मी श्वास रोखून पहात होते आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या जवळ आलास आणि मला घट्ट मिठी मारलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकते.
ती पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा तु मला अक्षरशः रडवलसं.
आणि तेव्हा मी ठरवलं तुझी मिठी विसरायची नाही. त्या जाणीवेनेच मला तुझ्यासोबत ठेवले आहे.
-----------------------------------------------------------------

प्रत्येक माणसाचं एक गुपीत असतं..ते इवल्याश्या मनाच्या कुपीत असतं..
ते कुपीत असेपर्यंत सुरक्षित असतं..मनाला नेहमीच आनंद देतं...  
जर... का मनाच्या कुपीतून साडलं..
तर... त्याचा आनंद हरवून जातो..म्हणूनच " जे जपलं ते आपलं ".
-----------------------------------------------------------------

बुद्धीबळ खेळातील एकमेव गोष्ट .....
आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्यानां मारता येत नाही.
-----------------------------------------------------------------

काय सांगू तुम्हाला मी देवाची लीला...नाही केला उपवास कधी ,
ना केला नवस.....तरीही दिला त्याने मला आजचा नवा दिवस ........
-----------------------------------------------------------------

ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही ,
तर त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे तेव्हा आपल्या जीवनातील गैरसमज आणि दुःख  दूर होईल......
-----------------------------------------------------------------

एखाद्या आवडत्या व्यक्तीला एवढंही निरखून पाहू नका की एखादा दोष दिसून येईल. आणि ......
एखाद्या नावडत्या व्यक्तीला एवढं ही टाळू नका की एखादा चांगला गुण बघायचा राहील.
-----------------------------------------------------------------

जसं पाणी उताराकडे वाहतं... तशी माणसं संशयाकडे सहज वाहतात.
उतार पाण्याचे अस्तित्व संपवतो... आणि संशय नात्याचे अस्तित्व संपवतो......
पाण्याचं समजू शकतो त्याला कळत नसतं.... पण माणसाला कळूनही वळत नसतं....
विशेष म्हणजे पाणी वाहताना जमिनीच्या गर्भात मूरण्यास किंवा सागराच्या अथांग रुपात उरण्यास नकार देत नाही.
पण....... माणसं आपल्यानांही आहे तसे स्विकारण्यास होकार देत नाहीत.
-----------------------------------------------------------------

असे वाटते दोन्ही हाताचे अंगठे वापरुन ठेंगा दाखविल्याप्रमाणे मेसेज लिहण्यापेक्षा.....
निरागस बोटे वापरुन केलेली कट्टी- बट्टी बरी होती.
करंगळीची कट्टी एकटीच पण तिचा कंटाळा आला कि दोन बोटांची बट्टी व्हायची.
-----------------------------------------------------------------

कधीकधी वाटते...

दिखाव्यातील जवळीकतेच्या ओलाव्यापेक्षा....
एकांतातील कोरडेपणा बरा.
निदान मनाला उगाचच भावनांची पालवी तरी फुटत नाही.
-----------------------------------------------------------------
विचार करतोय...

आजनंतर माणसात माणूस होऊनच जगायचं.
मनाच्या मारेकर्याना बिनधास्त सांगायचं......
एक डोळा बंद करुन धरलेला स्वार्थी नेम असतो.
माञ दोन्ही डोळे बंद करुन केलेल निस्वार्थी प्रेम असतं.
-----------------------------------------------------------------

स्वप्नांच्या या धूक्यामध्ये अडकू नकोस........
मनाला कधीही मारु नकोस.....
उधळून दे तूफान सारं मनामध्ये साचलेलं.....
प्रेम कर रक्तासारखं नसानसात पोचलेलं......
-------------------------------------------------

आज असं वाटतयं बंड करावे.....
मनाच्या प्रत्येक मारेकर्याला षंड करावे......
कारण ज्यांना मनाची किंमत नसते...
त्यांच्यात प्रेम करण्याची हिम्मतं नसते.....
ज्यांनी कधी प्रेम केलं नाही खरं...
दुःख नसावे असं मन मेलं तर.
---------------------------------------------------

मनाचा झरा नात्यांच्या बांधाने आडवला तर .........
भावनारूपी पाण्याने आयुष्यातील समाधानाची तहान सहज भागवता येते.
-----------------------------------------------------------------

किती बरं झालं असतं.....

जर आपल्या मनातलं सगळं चांगलं खरं झाल असतं.
किती वाईट झालं असतं....
जर सगळं चुकीचं राईट झालं असतं.
-----------------------------------------------------------------

जीवनात तीन गोष्टींची नेहमी काळजी घ्या....
वचन , मैत्री आणि नाते.    
कारण या बनत असताना आवाज होत नाही.
पण ह्या तुटल्यावर निर्माण  होणाऱ्या शांततेला भरुन काढण्यास वेळही कमी पडते. "जे जपलं ते आपलं"
-----------------------------------------------------------------

आपण माँर्डन झालोय........
आजकाल मुलगा आपल्या जन्मदात्या आईबापाला आपली नोकरी काय ? पगार किती ? किंवा बँक बँलंस किती आहे हे सांगताना टाळतो किंवा राग करतो.......
पण हीच माहीती तो लग्न ठरताना मुलगीदात्या मुलीच्या बापाला अदबिने , हसतमुख लाजतच पटापट देतो. वा... रे ....
-----------------------------------------------------------------

गैरसमजुतीचा फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...
"काही मिनीटांमध्येच" आपण 'एकत्र घालवलेल्या' 'शंभर सुखाच्या क्षणांचा' "तो विसर पाडतो". म्हणून "गैरसमज टाळा".
जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही...!
-----------------------------------------------------------------

कुणाला प्रेम किंवा विश्वास देणं सर्वात मोठी भेट असते.
आणि
कुणाकडून प्रेम आणि विश्वास मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो.
-----------------------------------------------------------------

स्वतःचा "राग" इतका महाग करा कि कोणालाही तो परवडणार नाही,
आणि स्वतःचा "आनंद" इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो फुकट लुटता येईल.
अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले.

मनोगत...

माणसाचा जन्म होणे म्हणजे जगणे नसते...

माणसाचा जन्म होणे म्हणजे जगणे नसते..... तर

न हारता जगणे हे जन्माला येण्याची कसोटी आहे.
माणसाला गवताच्या पात्यासारखे जगता आले पाहीजे...

कोणी पाणी नाही घातले तरी रुजायचे...
सूर्याच्या कोवळ्या आणि कडक किरणांना......

सैदव सांगत माझा जन्मच तुझ्यामुळे झाला आहे.
त्यामुळे तुला कोणत्याही रुपात मी स्विकारण्यास मी तयार आहे.
------------------------------------------------

परीस्थिती एवढी मोठी नसते की ती वेळेने दिलेलं जीवान स्वस्त करु शकेल.
परीरस्थिती देखील वेळेची बांधील असते. ती कायम राहत नाही.
मग अशा क्षणिक परीस्थिती समोर अनमोल जीवन स्वस्त करणारी माणसं जगण्यासाठी पाञ नसतात...
-------------------------------------------------------------------------

अनपेक्षित अडचणी आणि आव्हाने हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे.
फक्त आत्मविश्वास ठळू देऊ नका.

कारण अंधाऱ्या राञीचा अंत सकाळच्या सोनेरी किरणांनी होतो.
------------------------------------------

ञिवार सत्य....

कोणतेही विष सकारात्मक विचारला मारु शकत नाही...

आणि

कोणतेही औषध नकारात्मक विचाराला तारु शकत नाही.
--------------------------------------------

खूप काही लिहावसं वाटतय,
पण विचारांचं वादळ शब्दांना इकडं तिकडं लोटतयं......

अनेक आठवणींनी मन दाटतयं,
ओठांवर हसू येऊन डोळ्यांतलं पाणी गोठतयं.....

जगण्यासाठी लागणारं समाधानाचं अमृत मला तुमच्या निस्वार्थी प्रेमात आणि सहवासातचं भेटतयं.....
--------------------------------------------------------------------

माणसानं हसत रहावं....

डोळ्यांत आलेल्या अश्रूंनां अलगद टीपावं,
ओठांवर हळूवार स्पंदनाचं गोंदन करावं.
माणसानं हसत रहावं....

सुख दुःख येणार जाणार,
प्रत्येक क्षणाला मनापासून स्विकारावं.
माणसानं हसत रहावं.....

-----------------------------------
मन.....

एक असं रहस्य ...
ज्याला मोजण्याचं माप नाही.
ज्याला दुखवण्यासारखा शाप नाही.
ज्याला आवरण्यासारखा ताप नाही.
त्याच्या अस्वस्थेसारखा व्याप नाही.

-----------------------------------

असे नाही की माझ्यामध्ये भक्ती नाही...

मला मान्य आहे देवापेक्षा मोठी शक्ती नाही.
पण.. कोणतीही शक्ती माणसाला बंदीस्त करत नाही.
मग माणूस स्वतःला देवामध्ये का बांधून घेतो.
देव त्याच्याकडे काही मागत नाही...
तरी देवाला दान का देतो...
इथंच तर सारं चूकलयं...
दानी असूनही माणसाचं मस्तक देवापूढे वाकलय.

मनोगत.....
-----------------------------------
विश्वासाच्या लक्तरांना पोळणारे शाश्वताचे चटके सोसून थकले भागले काळीज करते मख्ख मेंदूला एकच सवाल..... To be or not to be?
उरात उफाळलेल्या एका तुफानाची केविलवाणी साद.....
विधात्याला आणि अस्तित्वाला पडलेला एकच सवाल...

जगावं कि मरावं ?

नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो हे जूने जागेपण.
प्रेताच्या निर्जिवपणानं अभिमानांवर होणारे बलात्कार. अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकर्याच्याच दाराशी.

नटसम्राट...