अजब विशेष .....

माणूस जन्माला येतो पहीलं वस्ञ घालतो ते " लंगोट " ज्याला खिसा नसतो...
माणूस मेल्यावर शेवटचे वस्ञ घालतो ते " कफन " ज्यालाही खिसा नसतो...
तरी आयुष्यभर माणूस पैसा मिळवण्यासाठी धडपडत असतो.
------------------------------------------------------------------

शब्दांना जिवंत करता आले असते तर......

मी जाणीव , एकनिष्ठता आणि माणूसकीला पहिले जिवंत केले असते...
-----------------------------------------------------------------------

देवाने माणसाला पाठीला डोळे नाही दिले ....

नाहीतर विश्वास घातक्यानां आनंदाने जगण्यासाठी वेळच मिळाली नसती.
------------------------------------------------------------------------

प्रत्येकजण .......

तसं कोणचं चुकीचा नसतो. प्रत्येकजन ........
फक्त स्वतःच्या जागेवर स्वतःसाठी बरोबर असतो.

तसं कोणचं भरवश्याचा नसतो.
प्रत्येकजण ........ स्वतःच्या सोयीने बेभरवश्याने वागतो.

तसं वाईट कोणीही नसतो.
प्रत्येकजण..... स्वतःच्या नजरेत नेहमी चांगला असतो.
----------------------------------------------------

इथं....

प्रत्येकजण घाईत आहे..... तरीही वेळेवर कोणचं पोचत नाही.
प्रत्येकजण मनापासून वागतो.... तरीही संशय घेणं सोडत नाही.
प्रत्येकजण मदत करतो.... पण स्वार्थ काही सोडत नाही.
-----------------------------------------------------------------

जिद्द .....

अनेकदा ठेच लागली आहे तरी ताठ मान करुन चालावं...
पडलं तरी स्वतःला तटस्थ राखावं....

पुढंच पाऊल पुन्हा जिद्दीने टाकावं....
आपलं धैर्य सिद्ध करावं ....

अन् आदर्श म्हणून उरावं.......
आपल नाव दगडावर नाही...तर माणसांच्या मनावर कोरावं.
-----------------------------------------------------------

एक दिवस असा येईल.....
तेव्हा हरवून जाणार आहोत स्वतःला.

मग उगाचच का बरं माणसं लपवून ठेवतात मनातल्या नात्याला.

त्यापेक्षा त्याला जपायचं...
भावनांच्या नाजुक क्षणानां अचूक आणि अलगद टिपायचं.

आपल्या माणसांना तुटून नाही द्यायचं   कारण एकदा आपलं माणूस हरवलं तर ते परत नाही यायचं.
-------------------------------------------------------------------

माणसं वचन देऊन आपले शब्द का बरं विसरतात...
मी तर ऐकलयं जिथे इच्छाशक्ती दाट असते....

तिथे मार्ग ही नतमस्तक होतात...
मग माणसं का साथ सोडून जातात.
-----------------------------------------

वेळ ......

एकतर वाट दावेल नाहीतर......
वाट लावेल.

वाट दावत असेल तर तिच्या सोबत रहा.
माञ तिला सोडलीत तर ती परत येणार नाही.

अन्

वाट लावत असेल तर तिच्या मागे रहा.
----------------------------------------------

कसं जगावं !

आपल्या हक्कातलं हक्काने मागावं..
आपल्या माणसाजवळ मनमोकळ वागावं.

आपल्यांच्या सुखासाठी स्वार्थीपण त्यागावं...
आपण असताना त्यांनी दुःख का बरं भोगावं.

आपल्या मायेत त्यांनी सदैव भिजावं.
असं जगाव.
-------------------------------------------

आज काही सुचत नाही ...

शब्दांच्या पलीकडे मन पोचत नाही.
आज काही.....

स्वतःचा स्वभावाच रुचत नाही.
आज काही......
-------------------------------------------

अस नाही की मला रडायला आवडत नाही....

पण....
मला कोणीही रडलेलं आवडत नाही.

कारण...
अश्रू म्हणजे देवाने आपल्याला दिलेले सर्वात मौल्यवान भेट आहे. ती मौल्यवान माणंसासाठीच आले पाहीजेत.

मनोगत...

माणसं काहीतरी लपवत असतात....

मनात भावनांच वादळ असतं ,
तरी चेहऱ्यावर खोटं हसू आणून .....
माणसं काहीतरी लपवत असतात.

वेळ कधी थांबत नाही वय वाढतचं.
तरी केस,ओठ, चेहरा रंगवून....
माणसं काहीतरी लपवत असतात.

घरात वावरायला जागा नाही.
तरी शेजारच्याशी स्पर्धा करत कर्ज काढून घरं नटवत असतात....
माणसं काहीतरी लपवत असतात.

कोणाला तरी खूष करताना कोणाला तरी दुखवत असतात.
स्वतःच मन मारुन.....
माणसं काहीतरी लपवत असतात.
---------------------------------------------

कधी मागण्याची वेळ येऊ नये....

निरागस भावनांचा अपमान कधी होऊ नये.
भावनांना सांभाळताना माणसावर... कधी मागण्याची वेळ येऊ नये.

बदालत्या आवडीमध्ये मनाचा खेळ होऊ नये.
थोडसं समाधान मिळावे यासाठी...
कधी मागण्याची वेळ येऊ नये.

मेल्यावर तर....
न मागताही लोक खांदा देतात.
म्हणूनच ....
जिवंतपणी कोणाचाही आधार
कधी मागण्याची वेळ येऊ नये.
---------------------------------------------

आज प्रत्यक्षात अनुभवताना सर्व तुझे बोल....

अचानक सुटतो माझ्या मनाचा तोल..
अलगद येतात पापण्यांवर येत पाणी.
क्षणभर डोळ्यांवर राज्य करतात अश्रू ....
भरून येत तुझ्या आठवणीत मन....
अन् येते तुझी आठवण .

चेहरा पाहून माझा कळतं तुला ...
काहीतरी केव्हा छळतं मला...
मायेने तु मला मिठीत घेणं...
अन् मी सगळ्या ञासातून विसावणं..
हवेहवेसे वाटतात ते सारे क्षण...
अन् येते तुझी आठवण.

किती  सहज कासावीस होतेस माझ्यासाठी...
पण मी माञ काहीच करत नाही तुझ्यासाठी ....
तूझा अधिकार आहे माझ्या प्रत्येक श्वासावर .....
मी प्रत्येक क्षण जगतोय फक्त तुझ्या विश्वासावर...
प्रश्न पडतो कसे फेडु तुझे हे ऋण ..
अन् येते तुझी आठवण...

जगात एकमेव आहे माझी.. अक्का.
------------------------------------

कधी कधी वाटते मला.....

काळजी करणे माणसाच्या स्वभावात,
ते लादले आहे नातेरुपी नियमाने.
रक्ताची नाती असतात जन्मजात,
अन् लग्नाची बेडी बांधली देवाने.

कधी कधी वाटते मला.......
बांधून ठेवतात माणसाला फक्त  समाजाची  नितिमुल्य,
खरंतर...
आईच्या गर्भाची नाळ एकच पविञ,
त्यानंतर बांधते माणसाला मंगळसूञ.

कधी कधी वाटते मला......
नाती म्हणजे फक्त सोय वाटते,
कारण ........
माणसाला एकटेपणाचं भय वाटते.

कधी कधी वाटते मला.....
प्रत्यक्षात माणूस असतो सुरक्षित फक्त .....
जन्माआधी आईच्या गर्भात आणि मृत्यूनंतर जमिनीच्या गर्भात.
----------------------------------------------------------------------

नक्की कसं जगायचं ....

जे आपलं आहे , ते जीवापाड जपायचं....की,
जे आपलं आहे त्याच्या पाठी उगाचच धावायचं.
नक्की कसं जागायचं...
हे ज्यांचे त्यानं ठरवायच.

ज्याला आपल्या भावना कळूनही जपण्याची इच्छा नसेल...तरी
आपण माञ त्याच्यासाठी दिवस राञ झुरायंच..
नक्की कसं जगायचं .....
हे ज्यांचे त्यानं ठरवायचं.

जे मनाला पटतं आणि योग्य वाटतं.
पण लोकांनी त्याला वेडेपणा म्हटलं... तरी कर्तव्य म्हणून ते शेवटच्या श्वासापर्यंत करायचं.....
नक्की कसं जगायचं ....
हे ज्यांचे त्यानं ठरवायचं.

मनोगत......

आयुष्याच्या वाटेवर चालताना ...

पुढे कोणी नसलं तरी.....
मागे कोणी आहे का हे पाहणं जरुरी असतं....

नुसतं  बेभान चाललं राहील तर...
मागे वाळल्यावर कळत आपण फार पुढे आलोय....

पुढे जाण्याच्या सवयीमुळं मागे जाणं ही अशक्य होतं.
-------------------------------------------------

 जेव्हा......

विचारांचे वादळ मनात थैमान घालत असेल.
तेव्हा......
स्वतःला स्वतःच सावरायचे असते.

कितीही भरून  आलं तरी अश्रूनां आवरायचे असते.
-------------------------------------------------

बरं वाटत......

जेव्हा मन भरुन येत, तेव्हा अश्रू शब्द बनून बाहेर येतात.
अश्रू पाठवनं शक्य नसतं.. शब्द सहज पोचतात...
फक्त शब्दाचां अर्थ योग्य लावता आला पाहीजे...

मग अश्रूचं महत्त्व कळतं....
बरं वाटतं..... जेव्हा मन दाटतं.
-------------------------------------------------

असं नाही की मला भावनिक ओळीशिवाय काही सूचत नाही....

फक्त भावनांचा आदर केल्याशिवाय मला लिहता येत नाही.
-------------------------------------------------

माणसाला ञास कधी होतो.....

जेव्हा माणूस जसा स्वभाव आहे न वागता वेगळे वागण्याचा प्रयत्न करतो.
-------------------------------------------------

जीवनात वादळ तर येतातच....
गवताच्या पात्यासारखे वाकून राहीले पाहीजे....
आपण आपल्या जागेवर टिकून राहीले पाहीजे....
( कधीकधी मोडून जाण्यापेक्षा वेळरुपी वादळासमोर वाकल्याने माणूस लहान होत नाही.)
कारण... वादळ येते  आणि जात देखील. जीवनात आलेल वादळ म्हणजे.....

आपला  संयम आणि आत्मविश्वास याची परिक्षा असते.
-------------------------------------------------

ती म्हणाली .....

Frankly सांगते माझा तुझ्यावर प्रेम नाही..
तुझा माझा काही एक सबंध नाही...

मी ही म्हटलं.....

चल हटा... मी ही काही मंद नाही...
थुंकलेलं चाटण्याचा माझाही छंद नाही....
-------------------------------------------------

जानीव माझ्या मनातली !

खरं आहे....

मी तुम्हाला खूप छळलं....
तरी तुम्ही मला कधीच नाही टाळलं..

हे जेव्हा मला कळलं....
तेव्हापासून माझं मन तुमच्या कडे वळलं....

तुमच्या सारख्या गोड माणसांना मी गजर्या सारखं मनात माळलं...
----------------------------------------------------------------

तुम्ही  माझ्या मनोगताला म्हननं...
छान आहे....

यातच माझा मान आहे...
जग मोठं आहे आणि

माणसांच रान आहे.
-------------------------------------------------

तुमच्यासाठी लिहताना....

मन असं भरुन येतं....
अवखळ पाडस जणू गायीकडे दूरुन येतं.
-------------------------------------------------

असल्या जरी कठीण भविष्याच्या वाटा.....
येतीलच तुमच्या कीनार्याला  समाधानाच्या लाटा....

रोजच....

कारण भरती - ओहटी समुद्रात होणारच.....
नैराश्य जाऊन समाधान आपल्याकडे येणारंच....
-------------------------------------------------

झाड आकाशाच्या दिशेने वाढत असले तरी जमिनीशी एकनिष्ठ असते.
जसे...

मुळांनी वाढलेल्या झाडाला तुम्ही मुळांसहीत उपटून काढू शकत नाही...
तसेच...

भावनांनी जोडलेल्या नात्याला तुम्ही मनापासून वेगळं करु शकत नाही...
जशी मुळं जमिनीशी एकरुप होतात तश्याच भावना मनाशी एकरुप होतात....

मनोगत....... 😊

नक्की काय होऊ....


नक्की काय होऊ....

कोणाच्या ओठांवर हसू आणायला ..
जोकर होऊ.
की
कोणाच्या जीवनात गोडवा आणायला ... साखर होऊ.
नक्की काय होऊ.

मेंदू मध्ये राहून... साठवण होऊ.
की
मना मध्ये राहून .... आठवण होऊ.
नक्की काय होऊ.

जे असूनही ज्यांना ओळख नाही त्याचं .... अस्तित्व होऊ.
की
ज्यानां स्वतःचे जाणवलं आहे पण इतरांना ओळख करुन देण्यासाठी त्यांचा ..... मार्ग  होऊ.
नक्की काय होऊ.
-----------------------------------------------------

जाण्याआधी असं काहीतरी करुन जावं.......
की आपण नसल्यावरही आठवणीत एखाद्याचे मन भरुन यावं.


तसे सिमेंट-विटांच्या घरात तर सारेच राहतात......
आपण एखाद्याच्या मनात घर करुन जावं.

वेळच नाही तर आपलेही दुःखाचे अश्रू देतेच.....
आपण एखाद्याच्या डोळ्यात आनंदअश्रू येतील अशी आठवण देऊन जावं.

जगण्यासाठी अन्न-पाणी कोणीही देतं किंवा मिळवतं......
आपण एखाद्याला जगण्यासाठी नवी उमेद देऊन जावं.

आनंद आणि पैसा मिळवाण्यासाठी सारेच नवी तंत्र शोधत असतात .....
आपण एखाद्याला समाधान आणि संयम याचा कानमंञ देऊन जावं.

जाण्याआधी असं काहीतरी करावं की......
-------------------------------------------------

कसं असतं जणातं जाणे फार सोपे असते....

एखाद्याच्या मनात जाणे तितकेच अवघड असते.

जणात लोक धनाने मोठे होत असतात..
मनात माञ मानाने मोठे होत असतात .

सत्ता- संप्पती संपली की जणातली एखाद्याची जागा सहज बदलते....
मनातली जागा जागा माञ शुद्ध प्रेमाने कायम राहते.

म्हणूनच जणात जागा मिळवण्यापेक्षा एखाद्याच्या मनात जागा मिळवावी .

-------------------------------------------------

मग नक्की का स्वार्थी आपण.....

तहानेपेक्षा जास्त पाणी पीत नाही कोणपण.
मग नक्की कशासाठी.....

नेहमी देवळात जाऊन येत नाही देवपण.
मग नक्की कशासाठी......

अमाप पैसा मिळवून कधी येत नाही शहाणपण.
मग नक्की कशासाठी.....

पोटात मावेल इतकच नेहमी खातो प्रत्येकजण.
मग नक्की कशासाठी......

मेल्यावर उंचीएवढीच जागा व्यापतो देहपण.....
मग नक्की कशासाठी......

संकटात नसतात आजूबाजूला चारजण.
मग नक्की कशासाठी......
-------------------------------------------------


कपडे आणि नाती....

आजकाल नाही माणसं ..
कपड्यासारखी बदलतात...

अगदी जुन्या कपड्याचा नवीन कपडे आल्यानंतर कसा विसर होतो...
अगदी तसेच नवी नाती जुळून आली की जुन्या नात्त्यानां माणूस विसरतो.

पण माणसं विसरतात...

कपडे निर्जीव आणि नाती सजीव असतात...
कपडे धाग्यांनी आणि नाती भावनांनी बनलेली असतात....
कपडे नटायला पण नाती आपल्यांसाठी झटायला असतात....
कपडे तन सांभाळतात आणि नाती मन सांभाळतात...

--------------------------------------------------------

पाहतो मी अनेक वेळा...

माझ्याच डोळ्यांनी ......
अस्पष्ट होणाऱ्या समोरच्या क्षणाला .

कळत नाही मला ....
मी काय करावं माझ्या समोरच्या बावरलेल्या मनाला.

अचानक माझ्या ....
नकळत होणाऱ्या अनपेक्षित हालचाली कशा कळतील कोणाला.

का सावरते वेळ मला नेहमी ...
अशा असह्य वेदना देऊन
कळेल का यातना माझी कधीतरी देवाला.

अचानक आलेला कंटाळा शब्दात उतरला आहे... टेन्शन नसावे.

मनोगत......

वेड लागलयं तुझच

वेड लागलयं तुझच
माझ्या जीवाला.......

कधी कळेल का या जीवाची घालमेल  तुला.....
वेड लागलयं तुझच माझ्या जीवाला.

माझ मन तुझ झालयं कळनार नाही कोणाला .....
वेड लागलयं तुझच माझ्या जीवाला.

नजरेत फक्त तू आणि आठवण तर प्रत्येक क्षणाला ......
वेड लागलयं तुझच माझ्या जीवाला.

तुझ्याशिवाय दूसरं काही सूचत नाही पुस्तक पुढ्यात असलं तरी वाचत नाही... काय करणार अभ्यासाला...
वेड लागलयं तुझच माझ्या जीवाला.

फक्त तुझच असावं मी असंच वाटत माझ्या मनाला....
वेड लागलयं तुझच माझ्या मनाला.

सांभाळ माझ्या सर्वस्वाला, हे एकच सांगनं देवाला....
वेडे  लागलयं तुझच माझ्या जीवाला.
---------------------------------------------

शरीर ...

किती सहज हाताळतो आपण हातानां.....
कधीच नाही समजून घेत आपण त्यांच्या व्यथांना.

सहज ऐकतो आपण कानांनी...
जरी ते दिसत नसले स्वतःच्याच डोळ्यांनी.
विचार तरी करतो त्यांच्या ञासाचा..
फरक जरी पडत नाही त्यानां वासाचा.

पाहतो रोज नकळत आपण आपले नाक वरवरुन....
कारण नाही पाहता येत त्याला आत शिरुन.
वाटते तुम्हांला काळजी त्याची जेव्हा होते सर्दी...
जेव्हा करतो शेंबूड त्यात जबरदस्त गर्दी.

ज्यामध्ये सारे विश्व मिळे ते डोळे...
रडताना वाटतात हे यडे की खुळे.
जरी असले असले कीतीही छान..
त्यानां दिसत नाही स्वतःची मान.
सगळं  काही पाहताना ही भान विसरता....
डोळे असतानाही नको तिथे घसरता.
काळजी घ्या यापुढे न विसरता.
--------------------------------------

माणसांच जग.......

मी असेन तर सर्व  आहे...
असा प्रत्येकाला गर्व आहे.

प्रत्येकाला वाटते मी असेन तर अर्थ आहे...
नाहीतर सर्व व्यर्थ आहे.

जो तो म्हणतो मीच खरा.....
ज्याल त्याला  हवा मानाचा तुरा.

प्रत्येकाला फक्त सुख हवयं .....
असावी मनाला दुःखाची ही सवय.

नेहमीच जर सारं झाल आपल्याच मनासारखं.....
इतरांकडे ही बरंच असतं आपण घेण्यासारखं.
-----------------------------------------------

कधीकधी खरं सांगू काय वाटते...
तुझ्या अंघोळीचा साबन व्हावे.
तुला मन भरुन पहावे.

कधीकधी बरंच काही वाटते..
ऊगाच publicity  नको..

बरं ... तुम्ही झोपताना आणखी काय वाटून घेऊ नका. झोपा अंगावर घेऊन
कारण...आता चादर व्हावसं वाटतयं.
--------------------------------------------------------

नेहमीच तिला नजरेने न्याहळायचा आता कंटाळा आला....

त्या दिवशी डायरेक्ट भिडलो तिला...

वाघासारखा तिच्यासमोर उभा राहीलो....

आणि म्हणालो ... बोल आज बिनधास्त काय बोलायचं आहे तुला ?

तिनेही गालात हसत उत्तर दिलं ...
कधी येशील रे घरी....

रक्षाबंधन की भाऊबिजेला.