माणसं काहीतरी लपवत असतात....

मनात भावनांच वादळ असतं ,
तरी चेहऱ्यावर खोटं हसू आणून .....
माणसं काहीतरी लपवत असतात.

वेळ कधी थांबत नाही वय वाढतचं.
तरी केस,ओठ, चेहरा रंगवून....
माणसं काहीतरी लपवत असतात.

घरात वावरायला जागा नाही.
तरी शेजारच्याशी स्पर्धा करत कर्ज काढून घरं नटवत असतात....
माणसं काहीतरी लपवत असतात.

कोणाला तरी खूष करताना कोणाला तरी दुखवत असतात.
स्वतःच मन मारुन.....
माणसं काहीतरी लपवत असतात.
---------------------------------------------

कधी मागण्याची वेळ येऊ नये....

निरागस भावनांचा अपमान कधी होऊ नये.
भावनांना सांभाळताना माणसावर... कधी मागण्याची वेळ येऊ नये.

बदालत्या आवडीमध्ये मनाचा खेळ होऊ नये.
थोडसं समाधान मिळावे यासाठी...
कधी मागण्याची वेळ येऊ नये.

मेल्यावर तर....
न मागताही लोक खांदा देतात.
म्हणूनच ....
जिवंतपणी कोणाचाही आधार
कधी मागण्याची वेळ येऊ नये.
---------------------------------------------

आज प्रत्यक्षात अनुभवताना सर्व तुझे बोल....

अचानक सुटतो माझ्या मनाचा तोल..
अलगद येतात पापण्यांवर येत पाणी.
क्षणभर डोळ्यांवर राज्य करतात अश्रू ....
भरून येत तुझ्या आठवणीत मन....
अन् येते तुझी आठवण .

चेहरा पाहून माझा कळतं तुला ...
काहीतरी केव्हा छळतं मला...
मायेने तु मला मिठीत घेणं...
अन् मी सगळ्या ञासातून विसावणं..
हवेहवेसे वाटतात ते सारे क्षण...
अन् येते तुझी आठवण.

किती  सहज कासावीस होतेस माझ्यासाठी...
पण मी माञ काहीच करत नाही तुझ्यासाठी ....
तूझा अधिकार आहे माझ्या प्रत्येक श्वासावर .....
मी प्रत्येक क्षण जगतोय फक्त तुझ्या विश्वासावर...
प्रश्न पडतो कसे फेडु तुझे हे ऋण ..
अन् येते तुझी आठवण...

जगात एकमेव आहे माझी.. अक्का.
------------------------------------

कधी कधी वाटते मला.....

काळजी करणे माणसाच्या स्वभावात,
ते लादले आहे नातेरुपी नियमाने.
रक्ताची नाती असतात जन्मजात,
अन् लग्नाची बेडी बांधली देवाने.

कधी कधी वाटते मला.......
बांधून ठेवतात माणसाला फक्त  समाजाची  नितिमुल्य,
खरंतर...
आईच्या गर्भाची नाळ एकच पविञ,
त्यानंतर बांधते माणसाला मंगळसूञ.

कधी कधी वाटते मला......
नाती म्हणजे फक्त सोय वाटते,
कारण ........
माणसाला एकटेपणाचं भय वाटते.

कधी कधी वाटते मला.....
प्रत्यक्षात माणूस असतो सुरक्षित फक्त .....
जन्माआधी आईच्या गर्भात आणि मृत्यूनंतर जमिनीच्या गर्भात.
----------------------------------------------------------------------

नक्की कसं जगायचं ....

जे आपलं आहे , ते जीवापाड जपायचं....की,
जे आपलं आहे त्याच्या पाठी उगाचच धावायचं.
नक्की कसं जागायचं...
हे ज्यांचे त्यानं ठरवायच.

ज्याला आपल्या भावना कळूनही जपण्याची इच्छा नसेल...तरी
आपण माञ त्याच्यासाठी दिवस राञ झुरायंच..
नक्की कसं जगायचं .....
हे ज्यांचे त्यानं ठरवायचं.

जे मनाला पटतं आणि योग्य वाटतं.
पण लोकांनी त्याला वेडेपणा म्हटलं... तरी कर्तव्य म्हणून ते शेवटच्या श्वासापर्यंत करायचं.....
नक्की कसं जगायचं ....
हे ज्यांचे त्यानं ठरवायचं.

मनोगत......

No comments:

Post a Comment