माझ्यासोबत कोण आहे हा विचार करत राहीलो असतो तर तुम्हा सर्वांना कधीच भेटलो नसतो. मी नेहमी कोणातरी सोबत असावं असा विचार करत असतो.
फक्त ज्या कोणाच्या सोबत असेण त्याला समजलं पाहिजे की तो/ती माझ्यासोबत आहे. यासाठी अधिक काही नाही फक्त " विश्वास " पुरेसा असतो.
-----------------------------
आपल्यासाठी कोणीतरी असावं अशी सगळ्यांनाच वाटत असतं.... आपण कोणासाठी तरी असावं म्हणजे कोणा एकाची तरी इच्छा पूर्ण होईल.
-----------------------------
जेव्हा तुमची वेळ चांगली असते तेव्हा तुम्ही केलेल्या चूकानां देखील लोक जोक समजतात. आणि जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा तुमच्या जोक ला देखील तुमची चुक समजली जाते.
-----------------------------
मी जो आणि जसा विचार करतो तो सगळ्यांना पटेल असे नाही...आणि माझा विचार पटलाच पाहिजे असा विचार करणारे पटेल माझ्या सोबत मी ठेवत नाही.
कारण प्रत्येक जण इतरांसाठी नटतो आणि फक्त माझ्यांसाठीच झटतो आणि नटतो.
-----------------------------
स्वतःला अवखळ समजून मी नेहमी निखळ माणसं शोधत असतो. माझ्यासारखेच असतात सर्व हे मला अनुभवाने कळते.
फरक एवढाच मी माझ्यामधील अवखळपणा स्वीकारून वागतो..मला भेटलेले बहुतांश त्यांचा अवखळपणा लपवून आणि नकारून वागताना दिसतात.
-----------------------------
नाती आणि फ्रीजमाध्ये तयार केलेले बर्फ एक सारखेच असतात....ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.*
दोघांना सांभाळण्यासाठी फक्त एकच उपाय असतो....गारवा कायम ठेवायचा असतो "
-----------------------------
जीवनात काहीही निर्माण करण्याआधी त्या निर्मिती ची जबाबदारी घेण्यास स्वतःला तयार करणे जरुरीचं असतं. पाण्यात उडी मारण्यासाठी पोहायला शिकणं जरुरी असतं.
पोहायचं म्हटलं की पाण्याचा गारवा आणि सर्दी सोसण्याची तयारी हवी.
-----------------------------
कशाच्या शोधात निघालाय यापेक्षा, जे शोधताय ते का शोधताय हे महत्वाचं असतं. सगळेच धावतायत म्हणून धावू नका, मी कशासाठी धावू हा प्रश्न दमछाक होण्याआधी स्वतःला विचारा.
कारण आपण इतरांना दोष देतो पण निर्णय स्वतःचेचं घेतो ना?
-----------------------------
अगणित मानाचे लोक आपल्या आजूबाजूला ठेवण्यापेक्षा , मोजता येतील एवढी मनाची माणसं ठेवा. आयुष्याच्या खडतर प्रवासात तुम्हांला इच्छापूर्तीची वाट आणि स्वप्न साकारण्याचा मार्ग लाभावा.
-----------------------------
चालताना ठेच लागली म्हणून आपण दगडावर राग काढत बसतो का? नाही! आपण आपल्या लागलेल्या भागाला जपून ठेवतो.
असचं... नात्यात ही करावं. जर आपल्याला कोणी दुखावलं तर त्याला दोष देत रहाण्यापेक्षा स्वतःच्या मनाला सांभाळावं.
-----------------------------
इथं प्रत्येकाला वाटतं की आपलंच म्हणणं बरोबर आहे! हो... अगदी खरं आहे. पण जसं आपण आपण आपल्या जागेवर बरोबर आहोत तसं समोरचा त्याच्या जागेवर बरोबर असेल.
ही साधारण गोष्ट स्वीकारणे माणसं सहज टाळतात..... तरीही मीच बरोबर आहे अश्या भ्रमात वागतात.
-----------------------------
" गणिती चिन्ह जीवनाचं "
आपण बरोबर असणं चूकीचं नसतं. फक्त आपण बरोबर असू तर समोरचा गुणाकार असल्यास आपल्या पेक्षा भारी असू शकतो. मग समजा आपण गुणाकार असल्यास समोरचा घातांकात किंवा वर्गमुळात असेल तरी आपल्यापेक्षा भारी असू शकतो. समजा आपण वर्गमुळ किंवा घातांक असलो आणि समोरचा सरासरी किंवा भाजक असेल तरी तो भारी असू शकतो. अर्थात....आपण बरोबर असणं कधीही छान असलं तरी बाकी राहणं अधिक उत्तम असतं. "बाकी" महत्त्वाची असते कारण जीवनाच्या गणितात सर्वांची ल.सा.वी., म.सा.वी., बेरीज, वजाबाकी, गुणोत्तर तर होणारच असते.
-----------------------------
वातावरणात मिसळलेला प्राणवायु जसा डोळ्यांना दिसत नाही पण तो श्वासात जानवतो, आपल्याला जीवन देत असतो.
अगदी तसंच मनाच असत मानवी शरीरातील मन दिसत नाही पण ते स्वभावात जानवते, आपणांस जाणीव देत असतं.
-----------------------------
कधी हीशेब करु नये वेळेचा, कारण वेळ कधी काही देत नाही आणि कधी कोणाचं काही घेत नाही.
हीशेब ठेवलाच तर जीवनात जोडलेल्या नात्यांचा ठेवा.
हीशेब ठेवलाच तर आयुष्यातील व्यतीत केलेल्या क्षणांचा ठेवा.
हीशेब ठेवलाच तर एकमेकांच्या सहवासातील आठवणींचा ठेवा.
कोणाला जोडले ?
कसे जोडले ?
कशा साठी जोडले ?
समोरच्याने जोडले का ?
काय मिळवले ?
काय गमावले ?
कारण या सर्वात आपण आपल्याला आणि आपल्यांना शोधू शकतो आणि ओळखू शकतो.
मनोगत...

No comments:
Post a Comment