अन् अचानक त्या नात्यांवर ही संशय घेतात माणसं.
असं का बरं वागतात माणसं?
काही कळत नाही !
एकटेपण असलं की मनाची सोबत शोधतात माणसं,
अन् कोणी थोडं वेगळ भेटलं की सोबतच्याला विसरतात माणसं.
असं का बरं करतात माणसं?
काही कळत नाही?
काही नसलं स्वतःजवळ की ऐकमेकांजवळ सहज हसतात माणसं,
थोडं काही मिळवलं की आपल्यांंजवळ हसणं ही व्यर्थ मानतात माणसं.
असं का बरं करतात माणसं?
काही कळत नाही!
अडचणी असल्या की आपल्यानां आठवतात माणसं,
अन् आनंदात आपल्यानांच विसरून इतरांना जोडतात माणसं.
अस का बरं करतात माणसं?
काही कळत नाही!
---------------------
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
निरपेक्ष नाती जोडताना,
जीवन रथ ओढताना,
खाचखळगे, चढउतार असणारच.
अशावेळी एकनिष्ठ राहून विश्वास जोपासत पुढं गेलं पाहीजे...
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
प्रत्येक माणूस इथं नवं आणि वेगळं काहीतरी मिळवण्यास धडपडत असतं.
इच्छा, आवड आणि प्राधान्य हे सगळं सोईस्कर बदलत असतं.
अशावेळी अधीर न होता जाणीव ठेऊन वागलं पाहिजे...
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
जीवनाच्या स्पर्धेत सगळे स्पर्धक भिडणारच,
आपआपल्या पद्धतीने नवीन चाल चालणारच,
स्पर्धा म्हटलं की हार जित होणारच.
अशावेळी यश- अपयश प्रामाणिकपणे स्वीकारले पाहिजे....
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
---------------------------------
भावनांचा बाजार....
आज बाजारात काय स्वस्त आहे? खोटेपणा !
आज बाजारात काय उपलब्ध नाही? खरेपणा !
आज बाजारात काय फ्री मिळत आहे? खडुसपणा !
आज बाजारात काय जाणवतयं? खवटपणा !
आज बाजारात काय शिजत आहे? खुरापतीपणा !
आज बाजारात काय जाणवत नाही? खमंगपणा !
---------------------------------
पहावं जरा स्मरुन !
कोठून आपण सुरूवात केली, कशी धडपड करुन.
मिळवलं सारं काही अपण ज्यांचा हात धरून.
कधीतरी त्यांची साथ पहावी जरा स्मरुन...
असे क्षण बरेच आहेत जेव्हा आपण गेलो होतो बावरून.
अलगद कोणीतरी आपल्याला घेतलं होत सावरून.
कधीतरी त्यांचं प्रेम पहावं जरा स्मरून...
एकटेच पुढे जात आहोत कोणी दिसत नाही दूरून.
ज्यांचा आधार घेतला त्यानां मागे आलो सारून.
कधीतरी त्यांची सोबत पहावी जरा स्मरून....
कोण इथं अमर राहणार वेळेवर मात करून.
एका क्षणाला सारेजण जाणार कर्म भरून.
कधीतरी त्यांंचा त्याग पहावा जरा स्मरून....
---------------------------------
मन थोडं खिन्न होत ! कारण...
मुद्दा अविश्वासाचा नसतो, रक्ताचं नातं नसतानाही एकमेकांना समजून घेतलेल्या मनातील श्वासाचा असतो.
मुद्दा आवडीचा नसतो, अनेकांना बाजूला सारून मनापासून आपण केलेल्या निवडीचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
मुद्दा कसल्याही उणीवेचा नसतो, स्वार्थ पाठी विसरलेल्या जाणीवेचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
मुद्दा डोळ्यांतील अश्रूचा नसतो, त्यानां जन्म देणाऱ्या मनातील निर्मळ भावनांचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
---------------------------------
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागतं असतो !
कोणी इतरांसाठी तर कोणी स्वतःसाठी जगत असतो.
अर्थात... कोणी कशासाठी आणि कोणासाठी कसं जगायचं हे जे तो स्वतःच्या मनानं ठरवत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
तसं आपण कुणाला काय देतो. रक्ताचा असो वा जोडलेला आयुष्यभर थोडी राहतो.
कोणी कोणाचं मन किंवा धन थोडीच चोरत असतो, त्यातला आनंद आणि समाधानाच क्षण स्वतःशी जोडत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
कोतीतरी समोरच्यात आपलं सर्वस्व पाहत असतो. तर कोणीतरी सर्व काही साधत असतो. जो आपले हेतू ठाम ठेऊन वागत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
---------------------------------
सवय...
जन्म झाला तेव्हा कोणा एका डाँक्टरने आपल्याला पहिल्यांदा हाथ लावला. काळजीचा हाथ होता तो तरीही रडलो.
पुन्हा आईच्या जवळ जाताच केवळ तीच्या उबदार स्पर्शाने शांत झालो.
अर्थात...तीच्या गर्भातच तीच्या उबेची सवय होती.
नंतर अनेक हातांंनी आपल्याला उचललं, खेळवलं पण सांऱ्यांच्याच हातात आपल्याला तसा उबदार आपलेपणा जाणवला नाही,
जेव्हा कधी आपल्याला मायेचा आणि सुरक्षिततेच्या ओलाव्याची कमी वाटली तेव्हा ही आपण खूप रडलो. परत आपल्याच्या सुरक्षा कवचात जाण्यासाठी.
अर्थात...आपल्याला आता आपले कोण याची सवय झाली होती.
आपण चालू , बोलू लागलो म्हणजेच शाळेत आलो. आता माञ स्पर्शातील उबदार पणाचा आपल्याला विसर पडला.
आता आपण फक्त विचारांची उब शोधू लागलो. जे आपल्या विचारांना मान्य करतील ते आपले समर्थक (मिञ) आणि जे आपले विचार मान्य करणार नाहीत ते आपले विरोधक (शञु).
अर्थात...आता आपल्याला विचारांच्या राजकारणाची सवय झाली.
आता आपण पैसा कमवायला लागलो. इथं मिञ आणि शञू या संकल्पना संपल्या. इथून पुढं सगळं व्यवहारात असणार. आपल्याला आवडणारे आणि न आवडणारे या सगळ्यांमध्ये आपण झक मारुन बसणार. अर्थात...आता आपल्याला इतरांना सहन करण्याची सवय झाली.
आपण कमवते झालो म्हणून आपलं लग्नाचं वय झालं. लग्न झालं आणि मायेची उब संपली आता फक्त शरीरांची देवान-घेवान एका नवीन शरीराला आकार देण्यास.
अर्थात ...स्वतःच्या इच्छेनुसार न जगता केवळ संसाराच्या चक्रात फीरण्याची सवय आपल्याला आपोआप होणार.
आणि पुन्हा तेच! सवयीच चक्र निरंतर वंशपरंपरेने पुढे जाणार.
मनोगत...

No comments:
Post a Comment