बदामाचे झाड आणि मी...

बदामाचे झाड आणि मी...

आपल्या आँफीसच्या खिडकीतून एक बदामाचे झाड दिसते ते मला माझ्यासारखेच आहे कि मी त्या झाडासारखा हा प्रश्न रोज पडतो.

काही दिवसापूर्वीच त्याच्या फांद्या हिरव्यागार झाल्या आहेत. त्याला वेळेने जनू नवा क्षृंगार दिला आहे. बघितलं की मन प्रसन्न होत.

मी त्याला बघतोय गेल्या ३ वर्षापासून   माझ्यासमोरच मोठं झालय ते कोणाच्याही माये- आधारावाचून..

वर्षातून तीन वेळा ते मोहरते.
धरणीच्या कुशीत दिलखूलास बहरते.
 त्याची काही फळे पोपट, खारी आणि इतर अपरिचित पक्षी देखील खाऊन जातात.. काही फळे खाली पाडून जातात... त्याच्यावर बसून मनसोक्त खेळून जातात.....
पण त्याबद्दल त्याचे आभार कधीच मानत नाहीत..
उडून जातात मन भरल्यावर..... तरी झाड त्यांचा राग करत नाही.

काही कावळे तर त्याच्यावर घर बांधून राहीले आहेत पण झाडाने त्याबद्दल तक्रार ही केली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडून भाडेही घेत नाही.

त्याची काही फळे अशीच गळून पडतात पण रुजत नाहीत कारण खाली काँक्रिट आहे ना ! मग मला वाटते त्यालाही कीती दुःख होत असेल.. स्वतःच्या अगांवर मुलांप्रमाने वाढलेली फळे गळतात तेव्हा वाईट वाटतच असणार.... पण त्याची खंत कधी त्याने व्यक्त केली नाही... मोठ्या मनाचं आहे ते..... कारण त्याने वेळेचे आणि निसर्गाचे नियम स्विकारले आहेत.

मागच्या महीन्यात मी आँफीसमध्ये नसताना फारच वाईट घटना घडली. त्या दिवशी मी राञी उशीराच परत आलो होतो. सकाळी नेहमीप्रमाणे त्याला न्याहाळायला गेलो आणि डोळ्यात पाणी आले... त्याच्या एका बाजूच्या फांद्या कोणीतरी तोडून गेले होते. मला ते सांगत होते खुप ञास झाला.... कारण का तोडले हे समजले नाही त्याला. म्हणाले ... मी तर कोणालाही ञास दिला नाही किंवा कोणाच्या अंगावर ही पडलो नाही.तरी मला पाडले असे म्हणत खूप रडले.
मलाही काही समजेना त्याची केविलवानी अवस्था पाहून मलाही काही उमगेना.
शेवटी त्याने स्वतःला सावरले, आपले रडू आवरले. मला म्हणाले खूप बरे वाटते.. तू जेव्हा मला पाहतोस तेव्हा हायसे वाटते. सार्या वेदना मेल्या आता तुझ्या प्रेमळ नजरेन दूर गेल्या आता. पून्हा आनंदाने वार्यावर लहरु लागलं.
मला म्हणालं कधीकधी येत जा.... थोडा वेळ मलाही देत जा.
कधी थकलसं वाटलं ... एकट एकट वाटंल... मी असेन तुझ्यासोबत.
माझ्या सावलीत कोणाचीही उपेक्षा नाही आणि मला कसलीही अपेक्षा नाही.
त्याने मला बरच काही शिकवलयं ..
मला म्हणतं मी तूला माझ्यासारख एकट एकट बर्याच वेळा पाहीलयं.

मला म्हणत...
नाराज नाही व्हयाचं आपल्या जागेवर कायम रहायाचं...
कारण आपण जोपर्यंत उभे असणार तोपर्यंतच लोकानां आपल अस्तित्व दिसणार...
-------------------------------------------------------------------------------------

आपणही असे स्वार्थी वागतो...

आपल्या चांगुलपणाबद्दल नेहमी काहीतरी का मागतो.
हे वागणं  माणसाच्या स्वभावाचे  एक अविभाज्य अंग असतं.

त्यामध्ये नफ्या- तोट्याचा संग नसतं.
जगात देणारे बरेच असले तरी आपण कोणाहीकडे मागत नाही.

कारण मनाला आपल्यांशिवाय कोणीही दिलेलं आवडत नाही.

शेवटी मन हे लहान बाळासारखं असतं.
आपल्या आईनं मारलं म्हणून तीला नाकारत नसतं.

पण मन जेव्हा तरुण होत तेव्हा त्यातलं निर्मळपण हरून जातं.

तेव्हापासूनच आपण अर्थी लागतो...
नकळत आपणही स्वार्थी वागतो.
-------------------------------------------------------------
सांगून ही ऐकत नाही...

आपला हट्ट सोडत नाही.

आठवणींमध्ये प्रत्येक क्षण नाहतं...
मन रोज तूझीच वाट पाहतं.

तसा त्याचा ही दोष नाही आणि ...
तुझ्यावर ही रोष नाही.

त्यालाही मी मारतं नाही...
कारण ते तुझ्याशिवाय कोणाचाचं हट्ट करत नाही .

लहान बाळ ते सांगून त्याला समजत नाही .
त्याच्या हट्टात मला दुसरं काही उमजत नाही.

माणसासारखं असत तर मोठं होत होत विसरल असतं...
स्वतःच्या सोईने त्यानं कोणाला तरी स्विकारलं असतं.

पण.. मोठं कधी ते होणार नाही...
कोणाच्याही दारी मायेसाठी जाणार नाही...

तसं ते एकमाञ आहे...
म्हणूनच तुझ्यासाठीच पाञ आहे.
------------------------------------------

माणसानं .......

इतरांवर नाही ठेवला तरी ....
स्वतःवर विश्वास ठेवावा.....माणसानं. .

इतरांना नाही हरवता आलं तरी....
स्वतः हरू नये...... माणसानं.

सर्वानाच नाही सांभाळता आलं तरी..
स्वतः ला सांभाळांव..... माणसानं.

इतर जरी स्वार्थी असले तरी.....
स्वतः एकनिष्ठ असावं.... माणसानं.

सारं जग खोटं असलं तरी.....
स्वतः खरं असावं.... माणसानं.

सगळेजण अयोग्य असले तरी....
स्वतः योग्य असावं... माणसानं.

सारेजण इतरांबरोबर असले तरी...
स्वतः स्वतःचे असावं.... माणसानं.
-------------------------------------------

ए मना.....

ए मना........फार हट्टी आहेस.
नेहमी स्वतःचीच सांगतोस कथा...
उद्या नसेल कोणीही बरोबर,
मग कोणाला सांगशील तुझी व्यथा.

ए मना..... बिनधास्त आहेस.
आज वागतोयस वाघासारखा,
मुकूट नाही तरी राजा सारखा.....
उद्या होशील मायेला ही पारखा.

ए मना..... स्वछंदी आहेस.
स्वतःला वाटेल तसाच वागतोस. पण शब्दाला जागतोस...
नेहमी आपल्यांसाठीच मागतोस.

ए मना..... वेडा आहेस.
आठवणींचा गाव सोडत नाहीस. नात्याशिवाय दुसरं काही जोडत नाहीस.
सगळंच जोडलेलं आहेस, अचानक विस्कटलं तर रडू नको बरं.

ए मना... रागीट आहेस.
तत्वानां सोडत नाहीस. अपमानाला पचवत नाहीस.
उद्या मानानं नाही ठेवलं , तर ञास करुन घेऊ नकोस.

माणसं सोयीने बदलतात हे लक्षात ठेव, बावरु नकोस.
वेळेसोबत रहा, घाबरु नकोस.

मनोगत.....

काळ दिखाव्याचा.....

दिखाव्याच्या या काळात सगळं कसं ठरलेलं असतं.....
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाटक / सिनेमातंल एक पाञ कोरलेल असतं.

प्रेम ही आजकाल दिखाव्यासाठीच केल जातं...
कारण आपणही माँर्डन आहोत याच प्रदर्शन रस्त्यावर मांडल जात.

भावना ही आजकाल दिखाव्याच्या बाजारात स्वस्त झाल्या आहेत....
कारण त्या फक्त आपल्यासाठी न राहता, सार्वजनिक झाल्या आहेत.

नाती ही दिखाव्याच्या वार्यावर मदहोश होऊन लहरत आहेत.....
जो कोणी पैशाचं खतपाणी घालेल तेथे अविचाराने बहरत आहेत.

घरं ही दिखाव्याच्या रखरखीतउन्हात ओसाड झाली आहेत....
माणसं अन् माणूसकी सोडून वस्तूंची आरास झाली आहे.
--------------------------------------------------------------

न राहून लिहावसं वाटल थोडं?

पैशाची स्थिरता मिळवताना
बरचं गणित चुकत जातं .....
पैसा गरजे एवढा असण्यातच  खरा आनंद असतो
शेवटी  हेच उत्तर बाकी राहतं.

लहानपणी शाळेमध्ये
एकच ड्रेस असायचा .....
खाकी चड्डी/ स्कर्ट  पांढरा शर्ट
प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा.

पायात चप्पल असणं
ही मोठेपणाची खून  असायची .....
मिञामध्ये एखाद्या कडेच
'बाटाची'चप्पल दिसायची.

रॅशनच्या दुकानावर
आपण चकरा मारायचो.....
तेंव्हा कुठं कापडाच्या  पिशवित
किलोभर साखर आणायचो.

एका वर्गातून पास होऊन जाताना
पुंस्तकं जुनेच असायचे ......
भारत माझा देश आणि बे एक बे
पोरं  आभिमानाने म्हणायचे

दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचो......
आवडणारा फराळातील पदार्थ
शेवटी खाण्यास ठेवायचो.

 श्रीखंड -पूरी , पापड, लोनचं
सणासुदीशिवाय नसायची.....
सकाळच्या नाष्टयाला माञ नेहमी
गरम चपातीच असायची.

पिझ्झा , बर्गर , न्यूडल्स
आजकाल फँशन आली आहे......
श्रीमंतीच्या मुखवटयामुळे
जगण्याची तारांबळ झाली आहे.

स्वयंपाक घरात आता सगळा
किराना भरलेला असतो ....
तरी घरची झूणका भाकर खाण्याचा
मुहूर्त येत नसतो.

हल्ली इथं प्रत्येकजन
धन शोधत चाललाय.....
हे माझं , ते मला करताना
मन हरवून बसलाय.

का बरं पहिल्यासारखे
पाहुणे आता येत नाहीत......
हसण्याचे आणि  खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत.

काय तर म्हणे आम्ही आता
हाय फाय झालो .....
चार पैसे मिळवूनही
माणूसकीच्या बाहेर गेलो.

कशामुळे घात झाला
काहीच कळंत नाही ......
एवढं मात्र खरं की
सुख समाधान मिळंत नाही .

प्रगती झाली का अधोगती
काहीच कळंत नाही....
माणसाला आपल्यांसाठी ही
वेळ मिळत नाही.

अहंकार कुरवाळल्या मुळे
प्रेमाचे झरे आटतायत.....
आणि
भावनांना सावरायला आपल्याःपेक्षा
" सायकियाट्रिक "जवळचे वाटतायत.

भ्रमा मधे राहु नका
जागं व्हा थोडं ......
माणसा शिवाय माणसाचं
सूटत नसतं कोडं.

न राहून लिहावसं वाटलं थोडं.
-------------------------------------

वेळेनूसार सारं काही बदलत असतं !

जीवनाचे रंग आणि ढंग बदलतात.....

गडद नात्याचे रंग .....
कळत फीखट होतात.
गोड वाटणारे स्वभाव ......
नकळत तिखट होतात.

नव्या स्वप्नाचे रंग  .....
नकळत रंगतात.
अपेक्षा चे भंग .....
पायदळी तुडवले जातात.

प्रत्येकजन आपआपल्या जागेवर...
बरोबर असतो.
वेळ बदलली तरी आपल्या सोबत असलेला व्यक्ती ....
आपला पाठीराखा खरोखर असतो.

बाकी....
वेळेनूसार सारं काही बदलत असतं.
--------------------------------------

आपल्याला कोणीतरी आदर्श समजणे.....

हे त्या माणसाचे मोठेपण असते...

कारण ....
आपण नक्की काय आहोत हे फक्त आपल्यालाच माहित असते.

खरंतर....
आपण आदर्श नसलो तरी कोणाचे काही जात नाही.

पाणी उताराशिवाय वाहत नाही.
आपण नसलो तरी... आपले बाळ जगणार हे प्रत्येक आईला माहीत असते.

तरी बाळासाठी जगण्याचा तीचा हट्ट असतो....

मनोगत.....

आपल कोणीही नसतं...

आपल कोणीही नसतं ...
जेव्हा आपलं मन आपलं नसतं.

अन् .....

जग ही स्वस्त असतं...
जेव्हा आपलं मन मस्त असतं.
वेळेने दीलेलं नेहमीच रास्त असतं.
-----------------------------------

मधमाशीची दृष्टी ठेवा.......
फुलांची कमी नसते.

एवढया मोठ्या पोळ्यात.....
आपली जागा आहे याची हमी असते.

आपली जागा टीकवुन पहा.....
अन् पोळ्याशी एकनिष्ठ रहा.
----------------------------

पादणे.....

आपल्यामध्ये पादलात तर आवाज आला पाहीजे ......
त्यांनी आपल्या पादाचाही मनमुराद हसून आनंद घेतला पाहीजे.

अन्...

आपल्यावर जळणार्यामध्ये पादाला तेव्हा ढूसकीच असली पाहीजे...
त्यांना फक्त ञास नाही तर श्वास कोंडून नाकातले केस करपले पाहीजेत..
-------------------------------------------------------------------------

सत्य.....

विश्वास जर बाजारात विकत मिळाला तर " नाते " नाहीसे होईल.

अन्.....

नात्यांचा बाजार बंद नाही झाला तर
" निखळ प्रेम " नाहीसे होईल.
-------------------------------------

एखाद्या व्यक्तीला आपले मानूनही......
त्याच्यावर विश्वास ठेवूनही....
मनात त्याच्याशी नाते जोडूनही.....

जेव्हा आपण.....

केवळ आपल्या सोयीने  त्या व्यक्तीबद्दल चूकीचा विचार मनात आणतो तेव्हा आपण माणूस नसतो...
कारण जनावरं ही सोयीने जगतात...

मनोगत.....
----------------------------------

कधी चांगली .......
तर
कधी वाईट .

कधी योग्य ......
तर
कधी अयोग्य .

कधी निछ्चित.....
तर
कधी अनिछ्चित .


कधी आवश्यक ......
तर
कधी अनावश्यक .

कधी आपल्यांकडून.....
तर
कधी परक्यांकडून .

कधी स्वार्थासाठी......
तर
कधी परमार्थासाठी .

अजबच असते ना...
माणासाची " इच्छा ".
----------------------

माणसाला आपल्या मर्यादा माहीत असल्या तरच.......
त्याला सत्य स्विकारता येते.

नाहीतर अपेक्षाचं मायाजाळ त्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही.
अपेक्षा आपल्या लायकीपेक्षा मोठ्या नसाव्यात....
------------------------------------------------------------------

माणसाला जीवंतपपणी
स्वस्थ ठेवणारी.....

किंवा

अस्वस्थ करणारे
एकमाञ सूञ  म्हणजे " मन "

जेव्हा मन स्वतःला जपतं तेव्हा ते स्वार्थी असतं....
इतरांना जपतं तेव्हा परमार्थी असतं.

जे मन स्वतःला जपत इतरांना जपतं ते " नात्याला " जन्म देत...
---------------------------------------------------------------

आपण एकटे असतो तेव्हा....
आपल्या भावनांना आवर घातला पाहीजे....

आणि...

जेव्हा आपण लोकांत असतो तेव्हा...
आपल्या शब्दांना आवर घातला पाहीजे.
----------------------------------------

तुमच्या सहवासातील .....

आनंदाने भरुन जात मन, आठवतात जेव्हा सारे क्षण....
तुमच्या सहवासातील......


शांत होऊन जातं सार विचारांच रण, स्मरता प्रत्येक पाऊल ...
तुमच्या सहवासातील.....
-------------------------------------------------------------

माणसाची विचारशक्ती किती विचिञ असते.....
त्याला जनावर म्हटलं तर राग येतो..

आणि
वाघ म्हटलं तर अभिमान वाटतो...
-----------------------------------

सोन्यात सुगंध नसतो....
ऊसात फळ नसते.....
चंदनात फुलं नसतं.....

विद्वान श्रीमंत नसतो....
आणि
श्रीमंत दिर्घजीवी नसतो.

माणूस कधीच परीपूर्ण नसतो.

मनोगत.....

जगात कसं वागाव.....

जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय .
मला
सर्वांचंच म्हणणं पटतं, त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय.
जगाचं असंच असतं.
मनुष्य गरीब असला की.....
लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.
श्रीमंत असला की.......
म्हणतात ,दोन नंबर करत असणार !
त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं ?
प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राब राबतोय .झालो का श्रीमंत ?
तो श्रीमंत झाला. निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही .

पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे.
पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात , त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही.

नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात.
जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या
म्हणतात.

समजा वाडवडीलांची संपत्ती
मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही.लगेच त्याला म्हणणार , बघा कसा बसलाय आयत्या बिळावर
नागोबा !स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात ?

आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत.....
म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा ? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ
नाही.असं आयुष्य काय कामाचं?

जास्त भाविक असला तर म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव.
मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.

तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात , अरेरे फार लवकर गेला.
त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता.
दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील
'' अजून किती दिवसकाढणार कुणास ठाऊक ?
''मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ म्हणतात.
जाड असला की हत्ती म्हणतात.

बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.
जाड मनुष्य दिसल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो.

सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार !
नाही केली तर म्हणणार साधी माणूसकी नाही.

सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता.
स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा . स्वार्थाचा पैसा काय कामाचा ?
विशेष म्हणजे....
खेळकर स्वभाव असला तर म्हणतात आचरट आहे. परिस्थितीचं गांभिर्य
नाही.
गंभीर असणंही त्यांना रुचत नाही.
म्हणतात हसण्याची अलर्जी आहे.

तुम्ही यशस्वी झालात तरी यांना
अडचण होते.म्हणतात आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.
अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही .मग भोगा कर्माची फळं.
 लोकांचं काय घेऊन बसलात ?
काहीही केलंत तरी त्याला नावं
ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती
मनावर घ्यायचं ?
जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ?
त्यापेक्षा मस्त मनासारख जगायचं आणि मस्त वागायचं.....

--------------------------------------------
कधीकधी वाटतं .....

मी का आहे असा ?
" चक्री वादळासारखा "

स्वतः उध्वस्त आणि आजूबाजूच्या सर्वांचे अस्तित्व उध्वस्त करत जाणारा......
भावनाशून्य आणि स्वप्नशून्य..

बिनधास्त आणि बेधडक...
स्वतः भोवतीच फिरत असताना,

मी घोगावत जाताना,
लोक माझा तिरस्कार करतात अन्..

घाबरतात ही मला आदरपूर्वक ..
कारण माझी गती हीच माझी शिस्त आहे......
मी माझ्यांच्या विचारातच मस्त आहे.

मनोगत.....

------------------------------------

शोध ....

कधी कधी विचार येतो मनात....
नक्की काय शोधतोय प्रत्येकजण
या माणसांच्या वनात.....

आणि

शोधही असा असंतुष्ट...
कुठे थाबांयच कोणालाच नाही स्पष्ट .

कोणालाही माहिती नाही कोणाचाच  पुढील क्षण...
धावत असते सैरावैरा अपेक्षा आणि स्वप्नानी भरलेल मन....

या शोधाची सुञधार म्हणजे वेळ...
आपल्यांमध्येच खेळावा,
हा शोधाचा खेळ.....

आज मला काय वाटते.....

माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवले पाहीजे.

सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीले पाहीजे.

माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम आणि एकनिष्ठतेने मला त्यांच्या नात्याला जपता आले पाहीजे.

माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नाही. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् समज माझ्याकडे कायम असला पाहीजे.

हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही आणि करु नये.

आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.

मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी तुम्हा सर्वाचा आभारी आहे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता विश्वासाने आणि प्रामाणिकपणे काम करत राहवे.

शेवटी... थोडं स्वार्थी होऊन....
माझ्या मनातल्या आणि मानातल्या सर्वांना मी सदैव आनंद आणि समाधान देण्यास समर्थ असावे.
तुमच्या सहवासातच शेवटच्या श्वासापर्यंत बसावे.

मनोगत.....
------------------------------------------------------------------------------------

का तेच कळत नाही....

असा कसा अचानक येतो कंटाळा...
कोमेजून जातो हास्याचा मळा...
का तेच कळत नाही.

का बरं आठुन जातात आशांचे झरे....
वाटू लागते साला...मेलेलं बरे....
का तेच कळत नाही.

कशामुळे मन होऊन जाते नाउमेद...
कसलं हे जगणं, वाटू लागतो खेद..
का तेच कळत नाही.

का बरं स्वप्नं सारी क्षणात तुटतात...
सारी वचन मग खोटीच वाटतात...
का तेच कळत नाही.

डोळे अलगद अश्रूंनी भरुन येतात...
सार्या इच्छा एकदम मरून जातात...
का तेच कळत नाही.

माणसांच्या गर्दीतही भीती वाटते..
आठवणीची जञाचं मनी दाटते...
का तेच कळत नाही.

मी चुकतोय की काही चुकवतोय...
कळतंय त्यांना तरी शिकवतोय...
का तेच कळत नाही.

बावरलेल मन माझ सैरावैरा धावतयं..
आधाराचा हात घाबरतचं शोधतयं...
का तेच कळत नाही...

मनोगत......
--------------------------------------------------------
मला पाहून म्हणाला .....

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.

आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा !  हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.

मीही मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो.

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.  कस काय सर्व ? घरचे मजेत ना?".

मी म्हणालो, "छान" चाललय सगळं....... "श्रद्धा" आणि "विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं,  धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय......... एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं  नावच "समाधान" ठेवलंय."


तसं ते हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं "मत्सरा"च्या हातात हात घालून अन मला "इर्षे"च्या विळख्यात ढकलून.......

मनोगत......

विचार म्हणजे....

Manohar Jadhav Sir
विचार म्हणजे....

मेंदू आणि मन यांचा सुवर्णमध्य....
तो नेहमी शाश्वत असावा.

मेंदूच्या स्वार्थीपणातआणि मनाच्या भोळेपणात वादळात न अडकलेला.
आपला विचारच चार माणसं जोडतो किंवा तोडतो.

-------------------------------------------------
जीवन एक प्रवास आहे.

नातेरुपी भिंतीवर भावनारुपी छप्पराचा निवास आहे.

सुख दुःख या प्रवासाची दोन चाक आहेत.

जन्म या प्रवासाचा आरंभ आहे आणि
मृत्यू या प्रवासाचा  शेवट आहे.

सर्वाचा प्रवास समाधानी होवो.

-----------------------------------------
मैत्रीचा मोती सगळ्यांच्याच भाग्यात नसतो.....

सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो.
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.

हाक तुझी...

साद माझी....

-----------------------------------------
माती जुळून आली की वीट बनते..
नाती जुळून आली की मीठ बनते...

अर्थात ....

जीवनाला एक गोड चव येते.

-----------------------------------------
सुरांच्या तारा जुळल्या की,
संगीत जन्म घेते.

अन्.....

मनांच्या तारा जुळल्या की,
नाते जन्म घेते.

-----------------------------------------
माणसं अजबच वागतात....
देवाला आपल्या घरी आणतात...

पण.....

देवाच्या घरी जायाची वेळ आली की..
नको नको म्हणतात.....

-----------------------------------------------------
नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत.

कारण काय सांगावं......
उद्या सगळं असेल पण ....
कुणी हक्काने भांडणारं, रुसणारं ,

समजावणारं आणि समजून  घेणारं,
खुदकनं हसणारं आणि हसवणारं

गोड प्रेम करणार आणि देणार
आयुष्यात नसेल.

आपली माणसं जपा...

-----------------------------------------------
आपण नेहमीच आपल्या जागेवरून इतरांच्या बाबतीत तर्क लावत असतो. पण सत्य वेगळेच असते.
म्हणूनच....

तुम्हांला दूरुनच मोहणारे... प्रत्यक्षात तसे असेलच असे नाही.
म्हणतात ना.... दूरुन डोंगर साजरे..

अगदी तसच असतं माणसांबाबत
माणसाच्या सहवासातच त्याच्या स्वभावाची ओळख होते.
त्यामुळे माणसं आपली करायची  असतील तर ती आहेत तशीच स्विकारण्याची तयारी हवी.

-----------------------------------------
जेवनात आणि जीवणात....
एकाच गोष्टींची गरज असते.

" चव "
जेवणात चव आणते " मीठ "

आणि

जीवनात चव आणते " नाते "
चव जरी दोन्हीही आणत असले तरी फरक एवढाच...

" मीठ " मुळातच खारट असते...
अन्
" नाते " सोईने चव बदलते.

-----------------------------------------
आपण.....

काय आहोत ?
कसे आहोत ?

कुठे आहोत ?
कोणासाठी आहोत ?

कशासाठी आहोत ?
कशामुळे आहोत ?

हे शोधण्यातच आयुष्य संपत. शेवटी कळत नसलेल्या गोष्टी शोधणे व्यर्थ असते.
---------------------------------------------------------------------------------------
तत्त्व ...

जो दुसऱ्यांना आनंदी पाहून आनंदी होतो....... तो देव.
जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधतो ........ तो मानव.

आणि

जो दुसऱ्यांना दुःखी पाहून आनंदी होतो...... तो दानव.

-----------------------------------------
माणूस दुःखी का होतो ?

कारण तो स्वतः चे आयुष्य इतरांच्या तुलनेत जगत असतो.

जिथे आत्मसमाधान नाही तिथे सुख नाही.

-----------------------------------------
खेळ....

काही माणसं म्हणतात.... आम्ही कधीच खेळ खेळलो नाही.
परंतु प्रत्यक्षात जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्म ते मृत्यू पर्यत एकखेळ खेळतच असतो....

त्याच नाव...... "लपंडाव"
खेळामधील सवंगडी म्हणजे " वेळ "

जन्मापासून म्हातारपणापर्यत...राज्य आपल्यावर असते आणि वेळ लपत असते....
अन्....

म्हातारपणानंतर राज्य वेळेवर असते आणि आपण लपत असतो....
नीतीचा खेळ खेळावाच लागतो.

मनोगत...... 😊

माझ्या मनातली इच्छा...



नेहमीच भांडण होत माझं.....
तिच्याबरोबर.

राग येतो मला तिचा...
जेव्हा ती स्वतःची जागा सोडून
डोक्यात शिरते.

स्वतः पुरताच विचार करते...
अन् मला वेठीला धरते.

मी तिला नेहमी समजावतो...
कधीकधी इतरांचा ही विचार कर.

तरीही ती ऐकत नाही...
रागवते.... रडते....
आणि
एकटीच बसून राहते.

माझा बच्चा....

माझ्या मनातली इच्छा .
---------------------------------------------------

'कपाट' आणि 'मन' या दोन्ही गोष्टी वेळोवेळी साफ़ केल्या पाहिजेत....

कारण 'कपाटाला' अडचण होते 'सामानाची'
...आणि...
'मनाला' अडचण होते 'गैरसमजाची '

    ""हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात.....

अन् शब्द असतात जादुगर
ज्यांनी माणसे जोडली जातात""
-------------------------------------
माणसं दुःखी केव्हा होतात ?

१. च्यापेक्षा जास्त मिळवताना...


आणि


२. अपेक्षा करताना....
-----------------------------------
माणसं अपरिपुर्ण का असतात ?

कारण मरेपर्यत नवीन गरजा आणि क्षणीक आनंद  कायम शोधत असतात.
आत्मसमाधान या शब्दाला ती  अपरिचीतच असावी  म्हणूनच ....

स्वतःच्या सुखाची व्याख्या ती इतरांच्या जीवनाच्या रंगात शोधत असतात.

तात्पर्य ... ती जन्म ते मृत्यू अपरिपुर्ण राहतात.
-----------------------------------------------------
पाहिलं ते लिहलं...

कोणाचे होणे फार सहज असते....

फक्त

कोणाचे कायम राहणे अवघड असते.
------------------------------------------------
थोडक्यात ...

मन नावाच्या तुरुंगात जाणं ....सोप

तिथं कायम राहणं.... अवघड

मन आहे तसं स्विकारावे लागते.

शरीर रंगांनी नटवता येत. मन रंगहीन असतं बर.. त्याचा रंग शोधू नये.

-----------------------------------

फरक.....

शहरात गावात गाई पाळल्या जातात आणि
कुत्री भटकत फिरत असतात,
तर ........
शहरात कुत्री पाळली जातात
आणि गाई भटकत फिरत असतात.

'
अनाथ आश्रमात मुले भेटतात गरिबांची.
आणि ........
वृद्धाश्रमात म्हातारी माणस भेटतात-'श्रीमंताची"

पाहीलं ते लिहलं.....
----------------------------------------------------

लोक म्हणतात.....

सत्य कडू असते.

परंतु ... मला वाटते सत्य चवहिन असते.

म्हणून ते लोकांना आवडत नाही.

-----------------------------------

कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नये ,
आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास
ते काम सोडूच नये.

जर आपला हेतुच शुध्द आणि
प्रामाणिक असेल तर,
आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच महत्व नसते.

चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात

मुखातून गेलेला राम आणि
निस्वार्थापणे केलेले काम
कधीही व्यर्थ  जात नाहीत."
-----------------------------------
माणसं कोणत्या गोष्टींना जपतात...

देव......जो कधीच प्रत्यक्ष भेटत नाही.

हवा.......जी कधीच प्रत्यक्ष दिसत नाही.

पाणी ...... जे कधीच प्रत्यक्ष पकडता येत नाही.

अग्नी .... ज्याला कधीच प्रत्यक्ष बंदिस्त करता येत नाही.

बरं आहे हे माणसाला करता आले नाही, नाहीतर हे सर्वदेखील कवडीमोल किंवा अर्थहिन झाले असते.

तात्पर्य ...
ज्या गोष्टी माणसाला मिळवता येत नाहीत त्या त्याला अनमोल वाटतात. आणि एकदा त्या मिळाल्या की निरर्थक वाटतात.

आपण  देव, हवा, पाणी, अग्नी नसलो तरी... जर सहज कोणालाही लाभलो की आपली कींमतही त्यांच्या ठायी नगन्य होते.

त्यामुळे आपली कींमत केली जाणार नाही आणि मान कधीच कमी होणार नाही अशा नात्यांना जपा.

जे जपलं ते आपलं हे जरी सत्य असलं तरी.... जे आपलं ते जनात जपण्यापेक्षा मनात जपणं महत्त्वाचे असते.

---------------------------------------------------------------------

"विश्वास"ज्यांच्यावर कराल तो इतका करा की ,
तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील......

आणि

"प्रेम" ज्यांच्यावर कराल ते इतकं करा की ,
त्यांना तुम्हाला गमवायची ( हरवून बसण्याची ) भीती राहिल...

--------------------------------------------------------------

तुमच्या बद्दल लोकांनी स्वतःच्या  सोयीने विचार केला तर.....

तुम्ही स्वतःला कीतीही शहाणे समजत असाल तरी तुम्ही वेडे आहात.

वेड्यानां दुःख झाले तरी त्यांनी ते दाखवायचे नसते. कारण ते दाखवले तरी.... लोक म्हणणार

तो वेडा आहे....

त्यात तुमची चुक नसते आणि लोकांचा दोष नसतो.

हा सगळा वेळेचा खेळ असतो.
-----------------------------------
माणसं  किती सहज बदलतात...

कदाचित ....

बदलण्याशिवाय काही पर्याय नसावा.

म्हणून .....

पर्याय निवडणे मला आवडत नाही. कारण आपल्याला वाटणारे उत्तर आपण लिहू शकत नाही.

मला मनाची उत्तरे लिहायला आवडतात... इतरांना चुकीची वाटली तरी ती आपल्यासाठी बरोबर असतात.

तात्पर्य ...
सगळेच आपल्या मनासारखा विचार करू शकत नाहीत. म्हणून आपण सर्वासाठी बरोबर असू शकत नाही.
----------------------------------------------------

जर...

कधी भेटली मला "वेळ"
नक्कीच सांगेन तीला.....
किती छान आहेत तुझे "खेळ"
अशीच छान खेळत रहा
कधीकधी.....
हरलेल्यांना ही जिंकवून पहा.
कळू दे त्यांनाही....
तु करत नाहीस भेदभाव
सर्वांच्या आठवणी
तुझेच असू दे नाव.

-----------------------------------

नेहमीच ती मला एकटीच दिसते..
कोणी सोबत नाही याचे दुःख नाही.

कोही मागे येईल याची भीती नाही.
कोणी पुढे जातायत याचा राग नाही.

कोणीतरी भेटावे अशी अपेक्षा नाही.
न राहून मी तिला विचारलेच....

तू अशी कशी राहू शकतेस...
ती पुढे चालतच म्हणाली...

मी अशीच आहे.

जो मला ओळखतो .....
तो माझ्यासोबत राहतो....

ज्याला माझी ओळख कळत नाही...
मी त्याला कधीच मिळत नाही..

खूपच आवडली मला ती....
ती म्हणाली....

मी तर तुझ्या सोबतच होते...
पण आज बोलण्याचा जुळून आला मेळ....

अहो ..... " वेळ "  हो   "वेळ".

मनोगत.....

फक्त अनूभवाने...

केवळ इच्छा माणसाला यशस्वी करत नाही,

तर.....

इच्छापूर्ती साठी केलेली प्रामाणिक आणि अथक मेहनत ही जरुरीची असते.

इच्छा तेथे अस्तित्व मार्ग ...

-------------------------------------------------------

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका ....

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,

प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही .......

खेळाडूला फक्त जिंकायचे असते..

-------------------------------------------------

माणसाच्या मनात एक सुप्त कप्पा असतो, तो अचानक उघडतो. नकळत..
यामध्ये सर्व सुप्त गोष्टी असतात. या गोष्टी त्या माणसाला आणि इतरांना ही माहीत नसतात.
आजची मनोगते त्या सुप्त कप्प्यातील आहेत. अगदी बालपणी च्या गोष्टीही असतील त्यामध्ये....
म्हणून ' फक्त अनूभवाने ' असे लिहले आहे.
तुम्ही " जे माझे आहात " ते सर्व कर्तव्यदक्ष आहात.

-------------------------------------------------

जाणीव ....

कर्तव्य हे हक्काबरोबर जन्म घेते.

पण...

हक्क नसतानाही आपल्यासाठी समाधान आणि आनंद घेऊन आलेल्या क्षणांचे जतन..

-------------------------------------------------


मदत करताना आपली किंवा समोरच्या व्यक्तीची निरपेक्ष भावना असली....

तरी...

समोरच्या व्यक्तीला  किंवा आपल्याला त्या भावनेची जानीव ठेवता आली पाहीजे.

-----------------------------------------------

बेधुंद जगण्याची नशा नाही मला...
बेफिकीरीने वागण्याची सवय ही नाही मला....
बेहीसाब खर्च करण्याची हौस ही नाही मला.....
बेलगाम बोलण्याची सवयही नाही मला....

फक्त .....

बेशुद्ध भावनानां जपण्याची सवय आहे मला....
हे माहीत असतानाही की...
शुद्ध आल्यावर त्या भावना आपल्या राहणार नाहीत.

------------------------------------

खरं खरं लिहताना....

खरंच सांगतो...
खरोखर एक विचार येतो.

हे खरे आहे की......
खरोखरच मी वेडा आहे.

पण वेडे होऊन जगणे मला आवडते.....

कारण....

प्रत्येक शहाणी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचे निवडते.
म्हणूनच......

वेड होऊन जगलं की आपण कोणाला आवडत नाही. मग कोणताही शहाणा स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याला निवडत नाही.