माझ्या मनातली इच्छा...



नेहमीच भांडण होत माझं.....
तिच्याबरोबर.

राग येतो मला तिचा...
जेव्हा ती स्वतःची जागा सोडून
डोक्यात शिरते.

स्वतः पुरताच विचार करते...
अन् मला वेठीला धरते.

मी तिला नेहमी समजावतो...
कधीकधी इतरांचा ही विचार कर.

तरीही ती ऐकत नाही...
रागवते.... रडते....
आणि
एकटीच बसून राहते.

माझा बच्चा....

माझ्या मनातली इच्छा .
---------------------------------------------------

'कपाट' आणि 'मन' या दोन्ही गोष्टी वेळोवेळी साफ़ केल्या पाहिजेत....

कारण 'कपाटाला' अडचण होते 'सामानाची'
...आणि...
'मनाला' अडचण होते 'गैरसमजाची '

    ""हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात.....

अन् शब्द असतात जादुगर
ज्यांनी माणसे जोडली जातात""
-------------------------------------
माणसं दुःखी केव्हा होतात ?

१. च्यापेक्षा जास्त मिळवताना...


आणि


२. अपेक्षा करताना....
-----------------------------------
माणसं अपरिपुर्ण का असतात ?

कारण मरेपर्यत नवीन गरजा आणि क्षणीक आनंद  कायम शोधत असतात.
आत्मसमाधान या शब्दाला ती  अपरिचीतच असावी  म्हणूनच ....

स्वतःच्या सुखाची व्याख्या ती इतरांच्या जीवनाच्या रंगात शोधत असतात.

तात्पर्य ... ती जन्म ते मृत्यू अपरिपुर्ण राहतात.
-----------------------------------------------------
पाहिलं ते लिहलं...

कोणाचे होणे फार सहज असते....

फक्त

कोणाचे कायम राहणे अवघड असते.
------------------------------------------------
थोडक्यात ...

मन नावाच्या तुरुंगात जाणं ....सोप

तिथं कायम राहणं.... अवघड

मन आहे तसं स्विकारावे लागते.

शरीर रंगांनी नटवता येत. मन रंगहीन असतं बर.. त्याचा रंग शोधू नये.

-----------------------------------

फरक.....

शहरात गावात गाई पाळल्या जातात आणि
कुत्री भटकत फिरत असतात,
तर ........
शहरात कुत्री पाळली जातात
आणि गाई भटकत फिरत असतात.

'
अनाथ आश्रमात मुले भेटतात गरिबांची.
आणि ........
वृद्धाश्रमात म्हातारी माणस भेटतात-'श्रीमंताची"

पाहीलं ते लिहलं.....
----------------------------------------------------

लोक म्हणतात.....

सत्य कडू असते.

परंतु ... मला वाटते सत्य चवहिन असते.

म्हणून ते लोकांना आवडत नाही.

-----------------------------------

कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नये ,
आपण करीत असलेल्या कामाने
अनेकांचे भले होणार असल्यास
ते काम सोडूच नये.

जर आपला हेतुच शुध्द आणि
प्रामाणिक असेल तर,
आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
टीकेला काहीच महत्व नसते.

चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात

मुखातून गेलेला राम आणि
निस्वार्थापणे केलेले काम
कधीही व्यर्थ  जात नाहीत."
-----------------------------------
माणसं कोणत्या गोष्टींना जपतात...

देव......जो कधीच प्रत्यक्ष भेटत नाही.

हवा.......जी कधीच प्रत्यक्ष दिसत नाही.

पाणी ...... जे कधीच प्रत्यक्ष पकडता येत नाही.

अग्नी .... ज्याला कधीच प्रत्यक्ष बंदिस्त करता येत नाही.

बरं आहे हे माणसाला करता आले नाही, नाहीतर हे सर्वदेखील कवडीमोल किंवा अर्थहिन झाले असते.

तात्पर्य ...
ज्या गोष्टी माणसाला मिळवता येत नाहीत त्या त्याला अनमोल वाटतात. आणि एकदा त्या मिळाल्या की निरर्थक वाटतात.

आपण  देव, हवा, पाणी, अग्नी नसलो तरी... जर सहज कोणालाही लाभलो की आपली कींमतही त्यांच्या ठायी नगन्य होते.

त्यामुळे आपली कींमत केली जाणार नाही आणि मान कधीच कमी होणार नाही अशा नात्यांना जपा.

जे जपलं ते आपलं हे जरी सत्य असलं तरी.... जे आपलं ते जनात जपण्यापेक्षा मनात जपणं महत्त्वाचे असते.

---------------------------------------------------------------------

"विश्वास"ज्यांच्यावर कराल तो इतका करा की ,
तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील......

आणि

"प्रेम" ज्यांच्यावर कराल ते इतकं करा की ,
त्यांना तुम्हाला गमवायची ( हरवून बसण्याची ) भीती राहिल...

--------------------------------------------------------------

तुमच्या बद्दल लोकांनी स्वतःच्या  सोयीने विचार केला तर.....

तुम्ही स्वतःला कीतीही शहाणे समजत असाल तरी तुम्ही वेडे आहात.

वेड्यानां दुःख झाले तरी त्यांनी ते दाखवायचे नसते. कारण ते दाखवले तरी.... लोक म्हणणार

तो वेडा आहे....

त्यात तुमची चुक नसते आणि लोकांचा दोष नसतो.

हा सगळा वेळेचा खेळ असतो.
-----------------------------------
माणसं  किती सहज बदलतात...

कदाचित ....

बदलण्याशिवाय काही पर्याय नसावा.

म्हणून .....

पर्याय निवडणे मला आवडत नाही. कारण आपल्याला वाटणारे उत्तर आपण लिहू शकत नाही.

मला मनाची उत्तरे लिहायला आवडतात... इतरांना चुकीची वाटली तरी ती आपल्यासाठी बरोबर असतात.

तात्पर्य ...
सगळेच आपल्या मनासारखा विचार करू शकत नाहीत. म्हणून आपण सर्वासाठी बरोबर असू शकत नाही.
----------------------------------------------------

जर...

कधी भेटली मला "वेळ"
नक्कीच सांगेन तीला.....
किती छान आहेत तुझे "खेळ"
अशीच छान खेळत रहा
कधीकधी.....
हरलेल्यांना ही जिंकवून पहा.
कळू दे त्यांनाही....
तु करत नाहीस भेदभाव
सर्वांच्या आठवणी
तुझेच असू दे नाव.

-----------------------------------

नेहमीच ती मला एकटीच दिसते..
कोणी सोबत नाही याचे दुःख नाही.

कोही मागे येईल याची भीती नाही.
कोणी पुढे जातायत याचा राग नाही.

कोणीतरी भेटावे अशी अपेक्षा नाही.
न राहून मी तिला विचारलेच....

तू अशी कशी राहू शकतेस...
ती पुढे चालतच म्हणाली...

मी अशीच आहे.

जो मला ओळखतो .....
तो माझ्यासोबत राहतो....

ज्याला माझी ओळख कळत नाही...
मी त्याला कधीच मिळत नाही..

खूपच आवडली मला ती....
ती म्हणाली....

मी तर तुझ्या सोबतच होते...
पण आज बोलण्याचा जुळून आला मेळ....

अहो ..... " वेळ "  हो   "वेळ".

मनोगत.....

No comments:

Post a Comment