विचार म्हणजे....

Manohar Jadhav Sir
विचार म्हणजे....

मेंदू आणि मन यांचा सुवर्णमध्य....
तो नेहमी शाश्वत असावा.

मेंदूच्या स्वार्थीपणातआणि मनाच्या भोळेपणात वादळात न अडकलेला.
आपला विचारच चार माणसं जोडतो किंवा तोडतो.

-------------------------------------------------
जीवन एक प्रवास आहे.

नातेरुपी भिंतीवर भावनारुपी छप्पराचा निवास आहे.

सुख दुःख या प्रवासाची दोन चाक आहेत.

जन्म या प्रवासाचा आरंभ आहे आणि
मृत्यू या प्रवासाचा  शेवट आहे.

सर्वाचा प्रवास समाधानी होवो.

-----------------------------------------
मैत्रीचा मोती सगळ्यांच्याच भाग्यात नसतो.....

सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो.
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.

हाक तुझी...

साद माझी....

-----------------------------------------
माती जुळून आली की वीट बनते..
नाती जुळून आली की मीठ बनते...

अर्थात ....

जीवनाला एक गोड चव येते.

-----------------------------------------
सुरांच्या तारा जुळल्या की,
संगीत जन्म घेते.

अन्.....

मनांच्या तारा जुळल्या की,
नाते जन्म घेते.

-----------------------------------------
माणसं अजबच वागतात....
देवाला आपल्या घरी आणतात...

पण.....

देवाच्या घरी जायाची वेळ आली की..
नको नको म्हणतात.....

-----------------------------------------------------
नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत.

कारण काय सांगावं......
उद्या सगळं असेल पण ....
कुणी हक्काने भांडणारं, रुसणारं ,

समजावणारं आणि समजून  घेणारं,
खुदकनं हसणारं आणि हसवणारं

गोड प्रेम करणार आणि देणार
आयुष्यात नसेल.

आपली माणसं जपा...

-----------------------------------------------
आपण नेहमीच आपल्या जागेवरून इतरांच्या बाबतीत तर्क लावत असतो. पण सत्य वेगळेच असते.
म्हणूनच....

तुम्हांला दूरुनच मोहणारे... प्रत्यक्षात तसे असेलच असे नाही.
म्हणतात ना.... दूरुन डोंगर साजरे..

अगदी तसच असतं माणसांबाबत
माणसाच्या सहवासातच त्याच्या स्वभावाची ओळख होते.
त्यामुळे माणसं आपली करायची  असतील तर ती आहेत तशीच स्विकारण्याची तयारी हवी.

-----------------------------------------
जेवनात आणि जीवणात....
एकाच गोष्टींची गरज असते.

" चव "
जेवणात चव आणते " मीठ "

आणि

जीवनात चव आणते " नाते "
चव जरी दोन्हीही आणत असले तरी फरक एवढाच...

" मीठ " मुळातच खारट असते...
अन्
" नाते " सोईने चव बदलते.

-----------------------------------------
आपण.....

काय आहोत ?
कसे आहोत ?

कुठे आहोत ?
कोणासाठी आहोत ?

कशासाठी आहोत ?
कशामुळे आहोत ?

हे शोधण्यातच आयुष्य संपत. शेवटी कळत नसलेल्या गोष्टी शोधणे व्यर्थ असते.
---------------------------------------------------------------------------------------
तत्त्व ...

जो दुसऱ्यांना आनंदी पाहून आनंदी होतो....... तो देव.
जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधतो ........ तो मानव.

आणि

जो दुसऱ्यांना दुःखी पाहून आनंदी होतो...... तो दानव.

-----------------------------------------
माणूस दुःखी का होतो ?

कारण तो स्वतः चे आयुष्य इतरांच्या तुलनेत जगत असतो.

जिथे आत्मसमाधान नाही तिथे सुख नाही.

-----------------------------------------
खेळ....

काही माणसं म्हणतात.... आम्ही कधीच खेळ खेळलो नाही.
परंतु प्रत्यक्षात जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्म ते मृत्यू पर्यत एकखेळ खेळतच असतो....

त्याच नाव...... "लपंडाव"
खेळामधील सवंगडी म्हणजे " वेळ "

जन्मापासून म्हातारपणापर्यत...राज्य आपल्यावर असते आणि वेळ लपत असते....
अन्....

म्हातारपणानंतर राज्य वेळेवर असते आणि आपण लपत असतो....
नीतीचा खेळ खेळावाच लागतो.

मनोगत...... 😊

No comments:

Post a Comment