आवड ही असावी लागते. आपण ती कोणा मध्ये निर्माण करु शकत नाही. कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या आवडीने आणि सवडीने समोरच्याशी वागत असतो.
मला भावनांचा बाजार माःडता आला असता तर मला ही तसं वागता आलं असतं. बर मला भावनांना फसवता येत नाही. तस असतं तर आज मला हे लिहता आलः नसत.
-------------------------------------
आनंद आणि दुःख या माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटना आहेत. बघा ना ! आज पर्यंत अनेक आनंद आणि दुःख देणाऱ्या घटना घडून गेल्या आहेत.
आपण त्या त्या वेळेस फारच भारावून गेले असाल... एकतर दुःखाने किंवा आनंदाने. पण त्यात तुम्हाला कायम राहता आलेले नाही. कारण घटना ही वेळेचा एक छोटासा भाग आहे.
आता मी म्हटले म्हणून कदाचित तुम्ही काही तरी आठवत असाल आनंदाचे किंवा दुःखाचे पण आता ते तुमच्या बरोबर नाही. आहेत फक्त आठवणी.
आठवण हे एकच असं औषध आहे जे पुन्हा त्या घटना आपल्या आयुष्यात आणू शकते. पाळलेल्या प्राण्यांना देखील आठवण ( ओळख ) असते. मग माणसात ती का बरं लोप पावत जात आहे?
-------------------------------------
कोणत्याही विशेष गोष्टीत एकमाञता शोधणे फार सोपे असते. परंतू एखाद्या सामान्य गोष्टीत विशेषता शोधणे फार कठीण असते.
मला सामान्यात विशेषता शोधणे जास्त आवडते.
-------------------------------------
कधीकधी खुप वेळ लागतो काही सत्य गोष्टी स्वीकारायला. मला आज स्वीकारावे लागले की, प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची वेळे कोणाला द्यायचे हे ठरवलेले असते.
जर तो वेळ तुमच्याकडे पाहिजे तेव्हा आला नाही तर ती वेळ आणि व्यक्ती तुमच्यासाठी नाही. कारण तेव्हा ती व्यक्ती त्याच्या स्वतःच्या आवडीच्या आणि सवडीच्या जगात असते.
-------------------------------------
कधीकधी मला वाटायचं "मी एकटाच" माझं कोणंच नाही. पण काही घटनांनी मला दाखवून दिलं...
एखाद्याची बरीच माणसं असूनही तो व्यक्ती एकटाच असतो. ती वेळ असते जेव्हा माणूस एका जागेवर पडून निष्क्रिय असतो.
-------------------------------------
माणसाच्या निर्मिती पासून त्याची माती होईपर्यत एकच गोष्ट त्याच्या सोबत असते......
"वेळ". त्यामुळे आपल्या वेळेला म्हणजेच आयुष्यातील प्रत्येक क्षणाला ज्यानं कोणी सजवले असेल त्याला विसरू नका.
-------------------------------------
मी मस्त दिसतो...मी मस्त लिहतो...मी मस्त नाचतो...मी मस्त हसतो...मी मस्त विचार करतो असं मला कोणी म्हटलंच नाही.
का कळतं नाही...कदाचित् मला विचार करता येत नाही. पण कृती करता येते.
-------------------------------------
नेहमीच वाटते मला... माझे विचार "मस्त" नसले तरी हरकत नाही, पण ते "स्वस्त" कधीच नसावेत.
जशी माझ्यात "लाज" नसेल तर हरकत नाही, पण चूकुनही "माज" नसावा.
-------------------------------------
एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणं कीती छान असतं....
कारण राग-रुसवा , गैरसमज , अविश्वास , दुःख अशा अनेक भाजकांनी भागले तरी प्रेमाची बाकी उरतेच.
-------------------------------------
माणसाच्या सद्य स्थितीवरून त्याच्या भविष्याचे अनुमान लावू नका. कारण वेळ अशी एक शक्ती आहे जी कोळश्यामध्ये हीरा निर्माण करते आणि शिंपल्यामध्ये मोती.
-------------------------------------
मी असाच होतो , असाच आहे आणि असाच असणार.
तुम्हांला हा अभिमान वाटत असेल तर हा माझ्यासाठी आत्मसन्मान आहे. तुम्हाला माज वाटला तरी माझ्यासाठी जगण्यासाठी साज आहे.
तुम्ही माझ्यासाठी असाल की नाही है मला माहीत नाही पण मला तुमच्यासाठी असले पाहीजे तर मला स्वतःला शाश्वत ठेवणे जरूरीचे आहे.
मला कोणीतरी सांभाळावं म्हणून मी कोणालाही सांभाळत नाही तर माझी जबाबदारीची जाणीव सोडून मला जगता येत नाही.
-------------------------------------
त्या दिवशीआँफीसच्या दिशेने चालत होतो होतो तेव्हा माझ्यापासून १०० मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती, बहुदा रोज नियमाने चालत असणार.
निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन असे वाटले.
मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला त्या माणसाला गाठायला थोडसं चालायचे होते आणि आँफीस कडे उजवीकडे फिरायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती...
थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती पाहून..
आणि तो क्षण आला, मी त्याला पार केले, मागे टाकले..!
हुर्र्ये.. हुर्र्ये.. हुर्र्ये..
मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा....! स्पर्धा..? याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता.
मात्र जिंकण्याच्या ओढीने मी माझा रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, परत चालणे वाढणार होते, अचानक चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता...
असेच होते ना आयुष्यात सुद्धा ? सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते; सहकारी ? शेजारी..? मित्र? नातेवाईक?, यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.
मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते.
या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.
कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.*
कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की; कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच; कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार; कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच; कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच; कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच...
तेव्हा लक्ष आपल्यावर, आपल्या ध्येयावर केंद्रित करावे, आपली चालण्याची गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे..? हे पाहावे. आहे ते कसे उपभोगता येईल हे पाहावे . आपल्याकडे आहे ते पहिलं जपावं.
मनोगत...

No comments:
Post a Comment