"मनोहर मैत्री" बनविण्यासाठी कृती.
मनामध्ये थोडीशी ओळख घालून ती नीट समजून घ्या. त्यात निखळ मैत्रीचे नातं घालून ते नीट एकत्र करा.
अर्थात ओळख आणि भावाना असल्याशिवाय मैत्रीला चव येणारच नाही. ओळख व मैत्रीचं नातं छान एकत्र झालं की त्यात चवीनूसार काळजी, प्रेम व विश्वास घालून पुन्हा एकत्र करा.
या मिश्रणाला आपूलकीचा एक वेगळाच रंग येईल आणि एकनिष्ठेने मैत्री अधिकच चवदार होईल. या मिश्रणात चिमूटभर रुसवा-फुगवा घालून पुन्हा एकदा एकजीव करा.
मैत्री अधिक रुचकर होण्यासाठी त्यात चिमुभर का होईना पण रुसवा-फुगवा हवाच,त्याशिवाय मजा येत नाही. हा रुसवा-फुगवा मैत्रीत विरघळून जाईल तेंव्हाच मैत्रीला खरी चव येईल.
आता ही मैत्री अधिक घट्ट व्हावी असे वाटत असेल तर त्यात आदर-सन्मान मिसळा व एकजीव करा. आता ही मैत्रीची डिश सजवण्यासाठी त्यावर गोड गोड हसूं पसरा आणि या घट्ट मैत्रीची चव घ्या.
ही घट्ट मैत्री आयुष्यभर छान टिकते. या मैत्रीने शरीराला स्थूलपणा येत नाही आणि ह्दयाला कोणत्याही परिस्थितीत ह्दयविकाराचा झटका येत नाही.
आवश्यक तेवढयाच गोडव्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता नाही. कोणत्याही प्रकारचा अती ताण तणाव नाही, असलाच तरी त्वरित हलकेच मिळणाऱ्या आधाराने रक्तदाब होत नाही.
आयुष्यातील प्रत्येक क्षणात जिवंत ठेवून जन्माला अर्थ आणणारी "मनोहर मैत्री" आपल्या सर्वांना लाभावी.
---------------------------------
* दगड *
'दगड' म्हणजे 'देव' असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे वेगवेगळ्या रूपात असतो मनात त्याचा विचार करून पाहीलं तर दिसतोच.
तसा तो फारच उपयुक्त असतो. अनोळख्या गल्लीत किंवा रस्त्यावर हाताला लागलाचतर तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो.
आजही दळण-वाटण करून देतो. मनमौजी मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो.
रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वत:ला फोडुन घेतो.
शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छिन्निचे घाव सहन करतो.
शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो. चिखलात पाय पडू नये म्हणून आधार देतो.
बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो.
मला सांगा, "'देव' सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं ?"
बाई म्हणतात, "तू 'दगड' आहेस. तुला गणित येत नाही. देवाला तरी कुठे गणित येतं? नाहीतर त्याने फायदा-तोटा बघितला असता. तो व्यापारी झाला असता."
दगडाला शेंदुर फासून त्यात भाव-श्रद्धा ठेवली की, त्याचा 'देव' होतो." म्हणजे, 'दगड'च 'देव' असतो.
मला तो खूप आदर्श वाटतो... कारण तो कोणालाही नाकारत नाही अन् स्विकारत ही नाही.
तो देवळाच्या कळसाशी असूनही राजा नाही आणि पायरीशी असूनही गुलामही नाही.
---------------------------------
* तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे व्यक्तिमत्त्व घडवीत असते. वाईट विचार आणि वाईट कृती ह्या जशा तुमचा घात करायला टपलेल्या असतात तसेच तुमचे चांगले विचार आणि तुमचे चांगले कर्मे तुम्ही जोडलेल्या नात्यातील माणूस रूपी देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात. म्हणूनच..... कोणाचे चांगले करता आले नाही तर हरकत नाही पण वाईट करून स्वतःला दोषपाञ करू नका.
---------------------------------
* ज्या माणसा मध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची उर्मी असते ,तीच माणसे खऱ्या अर्थाने खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात.
त्याचप्रमाणे अशीच नाती टिकतात ज्यात..शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि पैसा" नाही तर "स्वभाव आणि संबंध" कामाला येतात...
---------------------------------
* माणसाला उपजत एक गोष्ट मिळत नाही ती म्हणजे "जाणीव."
ती माणसानं स्वतःच्या स्वभावात निर्माण करून जोपासायची असते. कारण जीवनात आदर्श होण्यासाठी फक्त जाणीवेचीच गरज असते.
जन्म दिलेल्या आईपासून, जगायला शिकवलेल्या प्रत्येक व्यक्ती, वास्तू आणि वस्तूची जाणीव ठेवणं जरूरी असतं.
---------------------------------
* सुरवात करणे जरुरीचे असले तरी कुठे थांबावे हे माहीत असणे जास्त महत्त्वाचे आहे.
प्रयत्न करणे जरूरीचे असले तरी कशासाठी हे माहीत असणे जास्त महत्त्वाचे आहे.
प्रश्न करणे जरूरीचे असले तरी विषयाचा योग्य संदर्भ माहीत असणे जरूरीचे आहे.
प्रेम करणे जरूरीचे असले तरी नात्यांतील जाणीव व जबाबदारी माहीत असणे जरूरीचे आहे.
---------------------------------
* नजर *
माणसाच्या नजरेला लगेच काही दिसत असेल तर ते "जे अयोग्य आहे" पण "जे योग्य आहे" ते माणसाच्या नजरेला सहज स्विकारता येत नाही.
हा बहुतेक माणसांच्या स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. नजरेला दोष देऊन काही बदल होत नाही, माणसाला मनोभावना योग्य ठेवता आली पाहिजे.
कारण " मनी वसे ते नजरेला दिसे ".
---------------------------------
*"नातं "आणि "जिव्हाळा "*
दोनच गोष्टी अश्या आहेत की, त्यांना नियमांची गरज नसते...!
कोणी मनाशी जुळलं की "नातं "होते,
आणि
कोणी मनात शिरलं की,"जिव्हाळा ".
ज्यांचं मन, भावना सुंदर असतात, ज्यांना जाणीव असते.
त्यांना माणसं जपता येतात. अशी मनाची माणसं जोडा आणि जपा.
---------------------------------
*माणसातला " मी "*
* मी * का बोलू ?
* मी * का फोन करू ?
* मी * का कमीपणा घेऊ ?
* मी * का नमते घेऊ ?
* मी * का नेहमी समजून घ्यायचं ?
* मी * काय कमी आहे का ?
असे बरेच सारे "मी" आहेत
जे आयुष्यात बरंच काही "कमी" करतात आणि नुकसान करतात.
म्हणून "मी" पणा सोडा व नाती जोडा.
मनोगत.....

nice & superb....
ReplyDelete