कसे जगायचं हे माणूस ठरवू शकतो.
पण .....
कधीपर्यंत जगायचं हे माणसाला ठरवता येत नाही.
कारण.....
इच्छा आपल्या अधिकारात आहे पण वेळ आपल्या अधिकारात नाही.
लक्षात ठेवा...
वेळ आपल्या अधिकारात नसली तरी ती केवळ आपल्या भावनांचा आदर करते म्हणूनच इच्छा होऊन आपल्या अधिकारात येते.
----------------------------------------------
वादळात पत्यांचं घर बनत नाही
रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही....
जग जिंकण्याची हिम्मत ठेवा,
एकदा हरल्याने कोणी
फकिर होत नाही,
आणि.......
एकदाच जिंकल्याने कुणी "सिंकदर" होत नाही...
-------------------------------------------
माणुस नेहमीच मेंदूने विचार करतो.
तरीही......
मनाला वाटेल तसेच वागतो.
---------------------------------------------------------------
जे दिसत नाही तेच शाश्वत रहात.
कारण...
माणसाला जे काही दिसलं आहे ते सर्व त्याने स्वतःच्या सोयीने बदलले आहे.
माञ.....
जे माणसाला दिसलेले नाही तो ते जपण्याचा प्रयत्न करतो.
म्हणुनच माणुस न दिसणाऱ्या
धर्मातील "देव"
आणि
शरीरातील "मन"
यांना जपत असतो.
----------------------------------------------------
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ति आपोआप गुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोप-यात काही जण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैञी म्हणतात....
"जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत....कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं"
--------------------------------------------------
जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे.
----------------------------------------------------
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते.
---------------------------------------------------
अत्तराने कपड्यांना सुगंधित करणे
ही काही मोठी गोष्ट नाही..!
आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येते
जेंव्हा आपले आयुष्य आपल्या
कर्तबगारीने सुगंधित होते..!
वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात ,
दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते !!
मनोगत....






