मनातले सुविचार...

नाते हे हॄदयात असले पाहिजे
शब्दांत नाही!

आणि नाराजी ही शब्दांत असली पाहिजे
हॄदयात नाही.

ज्याला ‪जिंकून‬ देखील केव्हा हरायचं हे माहीत असतं..,
तो ‪हरून‬ सुद्धा जिंकलेला असतो.

------------------------------------------------------------

पहिली लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती ।

नंतर  लोक प्रैक्टिकल झाले
नात्याचा फायदा उचलू लागले ।

आता लोक प्रोफेशनल झाले
फायदा असेल तरच नाती बनवतात .

---------------------------------------------------------

परक्यांना  हि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात.

---------------------------------------------------------

देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना ...
ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या कि शेत बनते,
वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलत आणि बीज अंकुरल कि झाड होत.
म्हणून... माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून
घ्यायचं कि देव आपला उपयोग चांगल्या
गोष्टीसाठी करतो.

-------------------------------------------------------

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हवं असतं,
पण पाहिजे तेच भेटत नसतं,
सर्व काही नशीबात असतं,
पण आपलं नशीब घङवण हे आपल्याच हातात असतं.....
परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि  पैसा " नाही 
तर "स्वभाव आणि  संबंध" कामाला येतात ....

मनोगत.....

No comments:

Post a Comment