सरांच मनोगत...

मनोगत...

मनाला धिर देणार असत सरांच मनोगत....
रोज काहीतरी शिकविणार असत सरांच मनोगत...

जिवनातील रोज नविन पहाट घेउन येणार असत सरांच मनोगत...
भरकटलेल्यांना नवी दिशा देणार असत सरांच मनोगत...

एखद्याला बकरा बनवण्यात पण पुढे असत सरांच मनोगत...
मुलांच हसण बघुन आनंदीत होणार असत सरांच मनोगत...

रोज वाट बघायला लावणार असत सरांच मनोगत...
जगातिल घडामोडी सांगणार असत सरांच मनोगत..
----------------------------------------------------------------------------

मनोगत...

मला अस वाटतं कि मनोगत म्हणजे मनातुन येणारी भावना....
जी विचारांतुन शब्दात उतरते आणी आपल्या समोर येते.
मनात जे विचारा चालु असतात त्यातील थोडेच शब्द रुपी मांडता येतात...सर्वच विचार आपल्या समोर येत नाहीत आणि येऊ पण नये अस मला वाटतं.. मनातील सर्वच सांगायला पाहिजे असे काही नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------

मनोगत...
 
कुणी सांगेल का मला कुठे असेल मनोगत?
या वेड्या माणसाला कोणी सांगेल का?...
खुप अस्वथ वाटतयं जेव्हा पासुन हरवलं मनोगत....
मनाला धिर देणार, त्याला समजावणारं ते एकच तर होतं आमच म्हणुन घेणारं...
कदाचित रागवल तर नसेल ना? आमचि काही चुक तर झाली नसेल ना?.. ज्याणे ते आमच्या पासुण लांब गेलय...
मनात खुप चिंतेचे प्रश्न आहेत पण ते घालवणारं आमचं मनोगत कुठे तरी हरवलयं...
कुणि सांगेल का कुठे, कसे असेल ते...?

No comments:

Post a Comment