कधी कधी...

कधी कधी असे वाटते कि सर्वा काहि सोडुनी द्यावे. कुठेतरी लांब उंच अश्या ठिकाणी फिरायला जावे.

तिथे फक्त तुम्ही आणी मी असावे
बाकिच्यांना दुसर्या कामाला लावावे...

निसर्गाच्या सानीध्यात स्वताला हरवुनी द्यावे
पक्षांचि किलबिल मनात साठवावे...

वाहणार्या झर्या चे मधुर गित ऐकावे,
जिवन म्हणजे हेच असत का? मनाला ते विचारावे...

तेवढ्यात,
एक खारु ताईने तुमच्या कडे यावे, तुम्ही खुप आनंदुन जावे...

पण हे बघुन मला काहितरी अतरंगी सुचावे
आणी त्या खारुला मी हाकलुन लावावे...

तुम्ही रागाने माझ्या कडे बघावे,
मी हसुन धावत सुटावे, तम्ही पण पाठी पाठी यावे...

नंतर खुप हसावे, वेडे वाकडे नाचावे,
मुलांना पण त्यात सामील करुन घ्यावे...

जिवनातील अमुल्य असे ज्ञान तुम्ही आम्हाला द्यावे,
आणी मन लावुन आम्ही ते ऐकावे...

आयुष्य भर तुम्ही आमच्या सोबत आसावे
असे साकडे आम्ही सर्वानी देवाला घालावे....
कधी कधी वाटते मला.......आपण सर्व जन सोबतच असावे.....

No comments:

Post a Comment